Fertilizer : खत विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या पथकाची नजर

Agriculture Department : खरीप हंगामात शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची व चढ्या दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवण्याबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक तयार केले आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

सचिन लोंढे

Pune News : खरीप हंगामात शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची व चढ्या दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवण्याबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक तयार केले आहे.

विक्रेत्यांकडून खत देण्यास टाळाटाळ करणे, ज्यादा दराने खताची विक्री करणे, पक्की पावती न देणे यांसारख्या तक्रारीनुसार तालुक्यातील खतविक्रेत्या दुकानावर छापा टाकून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चाप लावला जाणार आहे.

सध्या शेतकऱ्यांमधून खरिपातील पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्याची लगबग सुरू आहे. उन्हाळ्यातील शेतीची मशागतीची कामे केल्यानंतर, पावसाळ्यातील चांगल्या पावसानंतर वाफशावर आलेल्या जमिनीत खरिपातील पिकांची पेरणी केली जाते. पेरणी केलेल्या पिकांना आवश्यक असणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची विक्रेत्या दुकानांकडे वर्दळ सुरु होते.

Fertilizer
Fertilizer Rate : खताच्या दरवाढीने बळीराजा संकटात

परंतु शेतकऱ्यांची खतांची गरज लक्षात घेऊन अनेकदा दुकानदारांकडून निकृष्ट दर्जाचे अथवा चढ्या दराने खतांची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लुटीचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या प्रकारास पायबंद घालण्याबरोबर, त्यांची आर्थिक लुट थांबविण्याच्या हेतूने तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन केले आहे.

तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजन व मापे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या आठ सदस्यीय पथकाच्या माध्यमातून दुकानांची तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्यानुसार दोषी दुकानदारांवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येणार असून, त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Fertilizer
Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

मशिनवर शिल्लक, गोदाम रिकामे

खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी जास्त असते. अनेकदा पॉस मशिनवर साठा शिल्लक असल्याचे दिसून येतो. प्रत्यक्षात मात्र युरियाचे गोदाम रिकामे असते. त्यामुळे नेमका युरिया जातो कुठे, असा सवाल उपस्थित होतो. दुकानदाराकडे चौकशी केल्यावर आधारकार्डाशिवाय शेतकरी युरिया घेऊन गेल्याचे सांगतात. मात्र दूध प्रक्रिया, पशुखाद्यनिर्मिती उद्योगात युरियाला असलेली मागणी विचारात घेता या प्रकाराची पारदर्शक चौकशीची गरज आहे.

इंदापूर तालुक्यात सुमारे ४०० परवानाधारक खते, कीटकनाशके व बियाणे विक्रीची दुकाने आहेत. या दुकानदारांना पॉस मशिनद्वारे खते विक्री करण्याची सूचना दिली आहे. निकृष्ट दर्जाचे व चढ्या दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी स्थापन केलेले भरारी पथक दुकानदारांवर वॉच ठेवणार आहे. दुकानदारांनी पॉस मशिनद्वारेच खत विक्री करणे बंधनकारक केले आहे.
- भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com