Swapnil Shinde
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतेच 'किसान लोन पोर्टल' लाँच करत शेतकऱ्यांना भेट दिली.
या पोर्टलच्या मदतीने किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत अनुदानित कर्ज मिळण्यास मदत होईल.
यानंतर शेतकऱ्यांना कर्ज वाटप, व्याज आणि या योजनेची सर्व माहिती मिळेल. यापूर्वी ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध नव्हती.
देशात सुमारे 7.35 कोटी शेतकऱ्यांची KCC खाती आहेत. त्यांना सवलतीच्या व्याजदरावर 6 हजार 573.50 कोटी रुपयांची कृषी कर्जे वाटप केली आहेत.
KCC चे लाभ 'PM-KISAN' या योजनेच्या लाभधारकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून ४% व्याजदराने कर्ज दिले जाते. ही योजना भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांनी सुरू केली होती.
भारतातील सर्व शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत.