Food Processing : अल्पभूधारक झाला डाळ मिल यंत्र उद्योजक

नगर जिल्ह्यातील शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील संतोष गादे या अल्पभूधारक शेतकऱ्याचा संघर्ष रंजक आहे.
Dal Mill Entrepreneur
Dal Mill EntrepreneurAgrowon

नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे संतोष व संदीप हे गादे बंधू राहतात. संतोष यांचे पदवीपर्यंत शिक्षण (Education) झाले आहे. संदीप सेतू केंद्र चालवतात. कुटुंबाला केवळ एक एकर जमीन. मात्र तेवढ्यावर कुटुंबाची गुजराण व्यवस्थित होत नव्हती.

त्यामुळे संतोष यांनी शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघात सचिव म्हणून नोकरी केली. मात्र व्यवसाय सुरू करून त्यात प्रगती करण्याची त्यांची इच्छा होती. नोकरी सांभाळून आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीही ते स्वतः करीत.

डाळ मिल यंत्राने दिली दिशा

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या पीकेव्ही मिनी डाळ मिल यंत्राची माहिती संतोष यांना ‘ॲग्रोवन’मध्ये वाचण्यास मिळाली. ते प्रभावित झाले. त्यानंतर विद्यापीठातील तत्कालीन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आवश्‍यक ७० हजार रुपयांची महिनाभरात जुळवाजुळव केली.

कुटुंबाकडे सोळा वर्षांपासून तीन हजार पक्षी क्षमतेचे शेड होते. त्याशेजारीच डाळमिल उभारली. या भागातील हा पहिलाच व्यवसाय असल्याने ग्राहकांची चांगला पसंती मिळू लागली. अनेक जण केवळ व्यवसाय पाहण्यासाठी येत. कृषी विभाग, पंतप्रधान ग्रामीण उद्योजकता विकास योजनेतून नव उद्योजकांना अनुदान असल्याने व्यवसायास चालना मिळाली. त्यातून हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांना सुमारे ४० जणांना संतोष यांनी अकोले, जळगाव भागांतून डाळ मिल खरेदी करून दिली.

Dal Mill Entrepreneur
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

दुरुस्तीतून यंत्रनिर्मिती

शहरटाकळी येथील व्यवसायात जम बसला होता. मात्र दुरुस्ती व अन्य अडचणीही येत. प्रत्येक वेळी यंत्र तयार करणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी येणे शक्य नव्हते. हीच अडचण अन्य शेतकऱ्यांनाही येऊ लागली होती. दुसरीकडे यंत्रांना मागणीही वाढू लागली होती.

मग अनुभवाच्या जोरावर संतोष यांनी स्थानिक कारागिरांच्या मदतीने शहर टाकळीत २०१८ मध्ये डाळ मिल निर्मिती सुरू केलीय. त्यासाठी दोन लाखांची गुंतवणूक केली. वेल्डिंग, बेंडिंग मशिन, ड्रील, लेथ, पत्रा कटिंग, आदी गरजेच्या यंत्रांची खरेदी केली. सहा महिन्यांनी नेवासा फाटा (ता. नेवासा) येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन तेथेही काम सुरू केले.

Dal Mill Entrepreneur
Rabi Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू

तंत्रज्ञानात सुधारणा

‘पीव्हीके मिनी डाळ मिल’ यंत्रात गरजेनुसार काही बदल केले. पहिले यंत्र तयार करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. हळूहळू त्यात कौशल्य येत गेले. पहिल्या वर्षात केवळ पंधरा यंत्रे मशिन तयार केले. आता वर्षाला दोनशेहून अधिक यंत्रे तयार केली जातात. सर्व प्रकारच्या कडधान्यांची डाळ तयार करता येत असल्याने शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे.

पाचशेहून अधिक यंत्रांची विक्री झाली आहेत. पैकी साठच्या जवळपास यंत्रे महिला बचत गट, तर साडेतीनशेहून अधिक यंत्रे शेतकऱ्यांनी नेली आहेत. आता नेवासा फाटा व घोडेगाव (ता. नेवासा) औद्योगिक वसाहतीत ‘वर्कशॉप’ उभारले आहे.

सोळा मजुरांना रोजगार

अल्पभूधारक असल्याने एकेकाळी स्वतः नोकरी शोधणारे, मिळालेली नोकरी टिकवून व्यवसाय उभा करण्याची धडपड करणारे संतोष यांनी आपल्या उद्योगातून सुमारे सोळा मजुरांना रोजगार दिला आहे. राज्य सरकारकडून त्यांना पुरस्काराने गौरवलेही आहे.

संतोष देवराव गादे, ९०११५४१६४६

कॉम्बो मशिन

डाळ तयार करण्यासह शेलर, एलेव्हेटर, ग्रेडर आदींचा समावेश असलेले ‘कॉम्बो मशिन’ वा युनिटही तयार केले आहे. त्रातील रोल, चाळणीचा आकार, ‘ब्लोअर’चे डिझाइन यात बदल केला आहे. हवेचा दाब कमी-जास्त करण्याची पद्धत तयार केली आहे.

Dal Mill Entrepreneur
Onion Plant : भाऊ, दादा आम्हलेही कांदानं उळे मिळई का!

क्षमतेनुसार एक लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. उदाहरण द्यायचे तर पाच टन क्षमतेच्या युनिटची किंमत ३५ लाख रुपये आहे. 'DAI युवराज' असे नाव त्यास दिले असून, यंत्र तपासणी व मान्यतेसाठी ‘आयसीएआर’ संस्थेच्या चेन्नई येथील केंद्राकडे ते पाठवले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com