Development Works : सहकार मंत्र्यांकडून आंबेगाव तालुक्यातील विकासकामांचा आढावा

Dilip Walse Patil : टंचाईग्रस्त गावातील पाणी स्रोतांचा आढावा घ्यावा. नळ पाणीपुरवठा जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilAgrowon
Published on
Updated on

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातील एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी कृषी विभागाने गावागावांत जनजागृती करावी. टंचाईग्रस्त गावातील पाणी स्रोतांचा आढावा घ्यावा. नळ पाणीपुरवठा जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या.

घोडेगाव येथील पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, माजी सभापती कैलासबुवा काळे, सुभाष मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावले, प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड,

Dilip Walse Patil
Village Development : देऊळगाव दुधाटे गावात लोकसहभागातून विविध विकासकामे

तहसीलदार संजय नागटिळक, सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, लहू थाटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कृषी आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, विद्युत वितरण, पाटबंधारे, जलसंधारण, आदिवासी विकास विभाग इत्यादी विभागांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी वळसे पाटील म्हणाले, ‘‘कृषी, आरोग्य या बरोबरच शालेय शिक्षणही महत्त्वाचे आहे. सर्व माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहांची पाहणी अधिकाऱ्यांनी करून त्याचा एकात्मिक विकास आराखडा बनवून अहवाल मला तातडीने सादर करावा. सध्या राज्यात जिल्हा परिषद,

Dilip Walse Patil
Development Work : बदलापूरमधील विकासकामांना खो

पंचायत समितीच्या निवडणुका नाही. त्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेले अधिकारी, कर्मचारी स्वतः च्या मर्जीप्रमाणे कामकाज करत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करावीत. आदिवासी भागात पाण्यासाठी मोठे तलाव व तळ्यांसाठी जागा सुचवावी, वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, कुपोषित बालकांसाठी कॅम्प घ्यावेत, अशा सूचना वळसे पाटील यांनी बैठकीत दिल्या.

विकासकामांवर भर

घोडेगाव येथील बसस्थानकासाठी २ कोटी रुपयांचा निधी देणार येणार आहे. अद्ययावत व सुसज्ज बस स्थानक तयार करण्यात येणार आहे. तसेच घोडेगावमध्ये पंचायत समितीच्या आवारात व्यापारी संकुल उभारण्यात येईल. मंचर नगरपंचायतसाठी भरपूर निधी दिला आहे. यातून मंचरचे सुशोभीकरण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com