VASAKA Sugar Factory : ‘वसाका’ पुनरुज्जीवनासाठी सकारात्मक चर्चा

Cooperative Sugar Mills : शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Nashik News : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) कसमादे परिसराचे वैभव होता. मात्र हा कारखाना सध्या बंद अवस्थेत असून उस उत्पादक शेतकरी, सभासद व कर्मचारी अडचणीत आहेत.

त्यातच कारखाना विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कारखाना संबंधित घटकांचे हित लक्षात घेता, कारखाना पुनरुज्जीवन अत्यावश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

गुरुवारी (ता. ३१) मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर ‘वसाका’संदर्भातील विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी कारखाना ऊर्जितावस्थेत कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Ajit Pawar
Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

या बैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, वसाका बचाव कृती समितीचे सुनील देवरे, सभासद पंडितराव निकम, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे, उपाध्यक्ष नंदू जाधव, अरविंद सोनवणे, दीपक पवार, अशोक देवरे, प्रकाश चव्हाण, सतीश शिरुडे, हिरामण बिरारी, आनंदा देवरे आदींसह संबंधित विभागांचे मंत्री, सहकारी संस्था प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रामुख्याने वसाका विक्रीची प्रक्रिया थांबविण्यात यावी, कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी तो भाडेतत्वावर पुन्हा चालविण्यात यावा व कामगारांची २०१२ ते १८ पासून असलेली ४३ कोटी पंचवीस लाख रुपये थकित रक्कम मिळावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Ajit Pawar
Vasaka Sugar Mill : ‘वसाका’ कारखान्याच्या विक्रीचा घाट

शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून वसाका कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या. बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक उपाययोजनांवर चर्चा झाली. ‘वसाका’संदर्भात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com