Agriculture Department : ‘कृषी’ने काढले २४ शासकीय आदेश

Government Order : तब्बल साडेसहाशे शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. त्यात कृषी विभागाने गुरुवारी (ता. ७) काढलेल्या तब्बल २४ शासकीय आदेशांचा समावेश आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता या आठवड्यात कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारचीही लगबग सुरू झाली आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मदत व्हावी, यासाठी अडलेली कामे सोडवून घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरीही गडबड सुरू आहे. ता. ४ ते ७ या कालावधीत तब्बल साडेसहाशे शासकीय आदेश काढण्यात आले आहेत. त्यात कृषी विभागाने गुरुवारी (ता. ७) काढलेल्या तब्बल २४ शासकीय आदेशांचा समावेश आहे.

काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका घेण्यात येणार आहेत. उद्या (ता. ११) पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार असून, मंगळवारी (ता. १२) मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये लोकानुनय करणारे काही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात साखर कारखानदारांसाठी बंद करण्यात आलेली थकहमी योजना पुन्हा सुरू करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Agriculture Department
Agriculture Department : ताटकळत ठेवलेल्या उपसंचालकांना बढती

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाला वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडी वेगाने हालचाली करीत आहेत. महायुतीच्या जागावाटपासाठी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर मोहोर लागल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतर महायुती उमेदवार जाहीर करेल अशी शक्यता आहे. या घडामोडी येत्या दोन दिवसांत होणार असून, १२ मार्च रोजी आचारसंहिता लागेल असे बोलले जात आहे. सायंकाळी आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून त्याच दिवशी दुपारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे.

Agriculture Department
Agriculture Department Staffing : कृषी विभागात प्रभारीराज

तत्पूर्वी प्रशासनाने अनेक कामे मार्गी लावण्यासाठी शासन आदेश जारी केले आहेत. या आदेशांमध्ये काही प्रशासकीय मान्यता, निधी खर्चास आणि वितरणास मान्यता, नळपाणीपुरवठा योजनांच्या मान्यता आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मेहकर, संभाजीनगर, स्मार्ट, उमरखेड, नाशिक, कृषी आयुक्तालय, नाशिक जिल्हा परिषद,वसंतराव नाईक कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आदी १७ ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या बदल्या पदोन्नतीने करण्यात आल्या आहेत.

सा. बां. विभागाच्या नियुक्त्या

सार्वजनिक बांधकाम (सा. बां.) विभागाने अभियांत्रिकी सहायक पदासाठी १३०० हून अधिक पदांची भरती नुकतीच केली. टीसीएसने घेतलेल्या या परीक्षेचा निकाल लावून कागदपत्रांची छाननी करून संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विभागाने काढलेल्या आदेशात संबंधित उमेदवारांना त्याचा रहिवास असलेल्या विभागात, जिल्ह्यात किंवा तालुक्यात नियुक्ती द्यावी असे म्हटले असले, तरीही विदर्भ मराठवाड्यातील उमेदवारांना पश्चिम महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांना नाशिक, मुंबई आणि अन्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com