FPC Mahaparishad 2023 : ‘एफपीसीं’ना अर्थपुरवठ्यासाठी महिन्याभरात ठरविणार धोरण

Farmer Producer Company : शेतकरी उत्पादक कंपन्या याआधी राज्य बँकेच्या कक्षेच्या बाहेर होत्या. त्यांच्या प्रगतीसाठी राज्य बँक नक्की अर्थपुरवठा करेल.
FPC Mahaparishad 2023
FPC Mahaparishad 2023Agrowon
Published on
Updated on

टीम ॲग्रोवन

Agrowon Farmer Producer Company : पुणे ः शेतकरी उत्पादक कंपन्या याआधी राज्य बँकेच्या कक्षेच्या बाहेर होत्या. त्यांच्या प्रगतीसाठी राज्य बँक नक्की अर्थपुरवठा करेल. यासाठी ‘ॲग्रोवन’, सह्याद्री ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि अन्य शेती तज्ज्ञांची समिती नेमून त्यांनी अहवाल द्यावा.

त्यावर विचार करून एक महिन्याच्या आत अर्थपुरवठ्याबाबत राज्य बँक सर्वंकष धोरण आखेल अशी ग्वाही राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ‘एफपीसी’ महापरिषदेत दिली.

ॲग्रोवनच्या एफपीसी महापरिषदेत शेतकऱी कंपन्यांसाठी व्यवस्थापन व आर्थिक नियोजन या चर्चासत्रात श्री. अनास्कर बोलत होते. त्यांच्यासह ‘सह्याद्री फार्मस’ कंपनीच्या ‘एच स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले देखील सहभागी झाले होते. श्री. अनास्कर म्हणाले, की विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ‘एफपीसी’ यांना एकाच प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जातील. त्यासाठी आपण प्रयत्न करू.

त्यासाठी ॲग्रोवनने पुढाकार घेऊन तज्ज्ञांची समिती नेमावी. या समितीने राज्य बँकेला १५ ते २० दिवसांत अहवाल द्यावा. पुढील महिन्याभरात आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू. त्याद्वारे किमान पाच ते १० हजार कोटी रुपयांची तरतूद करू असे आश्‍वासन अनास्कर यांनी या वेळी दिले. यश हमखास मिळते

FPC Mahaparishad 2023
FPC Mahaparishad 2023 : ‘एफपीसीं’ना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडणार

बँकिंग क्षेत्रात सुरक्षित बाजू म्हणून कुठलीही कागदपत्रे पाहण्याआधी संबंधित व्यक्तीचे चारित्र्य पाहिले जाते. प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतात. परंतु त्यावर मात करून तुम्ही पुढे जाता तेव्हा यश हमखास मिळते. जगातील कुठलाही व्यवसाय अडचणीत येत नाही. आपल्याला १० लाख रुपये हवे असतील तर पाच लाख मिळतील.

आपल्याला हवे आहेत तेवढीच मागणी करणे आणि त्याचा त्याच कारणासाठी उपयोग करणे हेही महत्त्वाचे असते. आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज मिळाले तर ते तुम्ही अनावश्यक क्षेत्रात गुंतवता. अधिकची रक्कम ही कमी उत्पन्नावर तुम्हाला सोसावी लागते.

याशिवाय परतफेड उत्पन्नातून केली पाहिजे. तुम्ही घेत असलेल्या कर्जाला कागदपत्रे उत्तम आहेत किंवा जामीन आहे म्हणून बँका कर्ज देत नाहीत. तर तुम्ही परतफेड कशातून करणार आहात हे अभ्यासूनच कर्ज दिले जाते असेही अनास्कर म्हणाले.

FPC Mahaparishad 2023
FPC Mahaparishad : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रश्नांवर रविवारी पुण्यात मंथन

व्यवसाय आराखडा महत्त्वाचा ः प्रमोद राजेभोसले

सह्याद्री फार्म्सच्या ‘एच स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेभोसले म्हणाले, की ‘एफपीसी’च्या नेतृत्वाला पाच स्तंभांवर लक्ष ठेवावे लागेल. यात बाजार किंवा ग्राहक, भांडवल, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मानवी स्रोत यांवर लक्ष ठेवावे लागेल. नाबार्ड आणि अन्य संस्थांकडून प्रशिक्षणासंबंधी कार्य केले जाते.

आपण बाजारपेठ विकसित करण्यात मागे पडतो. ती तयार करणे गरजेचे आहे. ‘एफपीसी’ चालविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया, धोरण, जागतिक दर्जाचे प्रक्रिया तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आदींवर भर द्यायला हवा. नेतृत्व करत असताना मुख्य पिकांचे परिपूर्ण ज्ञान असायला हवे. भांडवल उभा करण्यासाठी विश्‍वास हवा. त्यासाठी व्यापार आराखडा तयार हवा असेही राजेभोसले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com