Coconut Farming : देवरे कुटुंबीयांनी निवडली उत्पन्नवाढीसाठी नारळ शेती

World Coconut Day : वाजगाव (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कडुजी देवरे यांनी पाच एकर नारळाची लागवड केली आहे. उत्पन्नवाढीसाठी नवा पर्याय शोधला आहे.
Cocoanut Farming
Cocoanut FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील कसमादे परिसर बागायती शेतीमधील विविध प्रयोगांसाठी राज्यभरात ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी पीक विविधतेने आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र नैसर्गिक आव्हाने, वाढता उत्पादन खर्च व शेतीमाल विक्रीची जोखीम याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी नव्या पिकांचा शोध घेतला आहे. वाजगाव (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कडुजी देवरे यांनी पाच एकर नारळाची लागवड केली आहे. उत्पन्नवाढीसाठी नवा पर्याय शोधला आहे.

हवामान अनुकूल नवनवीन फळ पिकांची लागवड करणे हा देवरे कुटुंबीयांचा आदर्श आहे. यापूर्वी द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरू, सीताफळ, केळी, चिकू अशा अनेक फळपिकांच्या लागवडी करून यशस्वी उत्पादन घेतले आहे. गेल्या काही वर्षांत सफरचंद लागवड प्रयोग यशस्वी केला. तर शेतात ५ एकर क्षेत्रावर असलेल्या नारळ शेतीतून कोकणाची झलक पाहायला मिळते. या लागवडीची चर्चा जिल्हाभर आहे

Cocoanut Farming
Coconut Shell Ornaments : टाकाऊ नारळ करवंट्या बनू शकतात रोजगाराचं साधन

१९७३ मध्ये ठेंगोडा (ता. सटाणा) येथील सूतगिरणीच्या माध्यमातून त्यांना १५ नारळाची रोपे मिळाली होती. त्याची घराच्या मागे लागवड केली. त्यास ८ ते १० वर्षांनंतर नारळ येण्यास सुरुवात झाली. या झाडाला कुठलाही अतिरिक्त खर्च नसताना सरासरी १५० ते २०० नारळांपर्यंत उत्पादन येत ही बाब त्यांच्या लक्षात येताच सूक्ष्म पद्धतीने नारळ लागवड पद्धत, नियोजन व उत्पादनाचा अभ्यास केला.

त्यातूनच २०१३ साली नारळ शेतीचा पर्याय निवडला. टप्प्याटप्प्याने लागवड करत आज त्यांच्या शेतात २०२१पर्यंत त्यांच्या शेतात व बांधावर ५,५०० नारळाची लागवड आहे. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांसह गरजेनुसार स्थानिक रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केलेली आहे. ‘बाणावली, ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ’ या तीन वाणांची लागवड केली आहे

Cocoanut Farming
Coconut Farming : नारळ लागवडीतून उत्‍पादन वाढ

बाळासाहेब यांचा मुलगा विजय यांनी सांगितले, की बाणवली वाणाचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे आहे. पूर्ण वाढ होऊन ८ ते १० वर्षांनी फळे येतात. त्यास १०० ते १२० फळे येतात. शहाळ्यात पाण्याचा गोडवा व नंतर खोबऱ्याची जाडीही चांगली असते. तर ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ या वाणाचे आयुष्यमान तुलनेत कमी असते. मात्र त्यास चौथ्या ते पाचव्या वर्षापासून नारळ येते. त्याच्या खोबऱ्याची प्रत तुलनेत चांगली नसली तरी शहाळे पाणी पिण्यासाठी म्हणून वापर होतो.

...असे आहे अर्थकारण

इतर फळपिकांसारखे खते अन्नद्रव्य व्यवस्थापनात नारळ पिकासाठी अतिरिक्त खर्च नसतो. सिंचन हाच त्याचा मुख्य स्रोत आहे. तणव्यवस्थापन यात नसते. यासह उत्पादन खर्च मर्यादित असल्याने नारळाच्या टाकाऊ घटक जसे की फांद्या, जावळ्या यांची कुट्टी करून इतर फळपिकांना आच्छादनासाठी वापर होतो.

त्याशिवाय जागेवर तीस रुपये नगाप्रमाणे तर नारळ म्हणून २० रुपये नगाप्रमाणे जागेवर विक्री होते. सध्या प्रतिझाड सरासरी ३,००० ते ३,५०० हजार उत्पन्न मिळते. सध्या लागवडीच्या क्षेत्रात ३,००० झाडांना नारळ येत आहे. देवरे यांची लागवड पाहून गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात किमान ५ ते १० नारळ लागवड केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com