Coconut Shell Ornaments : टाकाऊ नारळ करवंट्या बनू शकतात रोजगाराचं साधन

Team Agrowon

सामान्यपणे नारळ फोडून त्याच्या करवंट्या या टाकाऊ वस्तू म्हणून फेकून दिल्या जातात. पण या करवंट्या गोळा करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास चांगला फायदा मिळतो.

Coconut Shell Ornaments | Agrowon

करवंटी पासून शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी करवंटी कापणे, मागणीनुसार वस्तूंना आकार देणे, पॉलिशिंग करणे इत्यादी कामे केली जातात.

Coconut Shell Ornaments | Agrowon

करवंटी घासून चकचकीत केली जाते. त्यापासून फ्लॉवरपॉट, अरगबत्तीचे स्टॅण्ड, स्टोअरेज कंटेनर, चमचे, बाउल, कलश, मंदिराच्या प्रतिकृती यासारख्या वस्तू तयार करता येतात.

Coconut Shell Ornaments | Agrowon

करवंटी घासून चकचकीत करण्याच्या कामासाठी जास्त वेळ लागतो, पण आता वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी ग्राइंडरचाही वापर होतो.

Coconut Shell Ornaments | Agrowon

बचत गटाच्या माध्यमातून महिला नारळाच्या करवंटीपासून वस्तू तयार करून त्यांची विक्री करु शकतात.

Coconut Shell Ornaments | Agrowon

टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या उपयोगी वस्तूंच्या विक्रीतून महिलांना घरबसल्या चांगला रोजगार शिळू शकतो.

Coconut Shell Ornaments | Agrowon

ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू तयार केल्यास या करवंट्यापासून जास्तीचा मोबदला मिळू शकतो.

Coconut Shell Ornaments | Agrowon