Agriculture Department Malpractice : गैरव्यवहारातील ३१ मध्यस्थांची यादी लोकायुक्तांना सादर

Malpractices Update : कृषी खात्यातील बदल्या व पदोन्नत्यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत ३१ मध्यस्थांची यादी राज्याच्या लोकायुक्तांकडे देण्यात आली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी खात्यातील बदल्या व पदोन्नत्यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत ३१ मध्यस्थांची यादी राज्याच्या लोकायुक्तांकडे देण्यात आली आहे. या यादीत काही बड्या अधिकाऱ्यांची नावे असल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Agriculture Department
APMC Financial Malfeasance : मुंबई बाजार समितीचे संचालक पानसरे अटकेत

बदल्यामध्ये कोणत्या राजकीय नेत्याने कसा गैरव्यवहार केला व अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या रकमा कोणत्या मध्यस्थांकडे दिल्या. या मध्यस्थांनी या रकमांची गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली याचाही तपशील देण्यात आला आहे. गैरव्यवहाराच्या मुळाशी जायचे असल्यास या प्रकरणाशी संबंधित सर्व संशयास्पद अधिकाऱ्यांचे, कंत्राटदारांचे, नातेवाइकांचे भ्रमणध्वनीवरील संवाद तपासावेत, गैरव्यवहारातील मालमत्ता शोधण्यासाठी प्राप्तिकर खात्याची मदत घ्यावी तसेच गैरव्यवहाराचे धागेदोरे शोधण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा वापरावी, अशी लेखी मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आलेली आहे.

कृषी खात्यात झालेल्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार मूळ तक्रार राज्याच्या उपलोकायुक्तांकडे केली गेली होती. तक्रारीची सुनावणी घेतली जात असताना एका मंत्र्याचे वारंवार संदर्भ येऊ लागले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले व मूळ तक्रार लोकायुक्तांकडे गेल्या महिन्यात वर्ग केली गेली. विशेष म्हणजे लोकायुक्तांनी थेट तत्कालीन मंत्र्याला नोटीस बजावत सहा आठवड्यांच्या आत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणातील तक्रारदार वसंत मुंडे यांनी लोकायुक्तांकडे गैरव्यवहारातील मध्यस्थांची यादीच सादर केल्यामुळे काही अधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

‘कृषी खात्याच्या आस्थापना विभागाने या गैरव्यवहाराला झाकणारा खुलासा केला आहे. तसाच खुलासा तत्कालीन मंत्र्याकडून देखील येऊ शकतो. त्यामुळे गृह विभागाच्या मदतीने या प्रकरणातील अधिकारी, मध्यस्थांचे भ्रमणध्वनी, दूरध्वनी, व्हॉट्‍सअप कॉल्स याचे सीडीआर (कॉल्स डिटेल्स रिपोर्ट) मागावून घ्यावेत. या प्रकरणात कोण, केव्हा मंत्रालयात गेले याच्याही नोंदी तपासाव्यात तसेच प्राप्तिकर विभागाकडून मालमत्तांचे तपशील तपासावेत,’’ अशी मागणी लोकायुक्तांकडे केलेल्या नव्या पत्रव्यवहारात करण्यात आली आहे.

लोकायुक्तांच्या यादीत एकूण १५ मध्यस्थांची नावे देण्यात आली आहेत. त्यात एक उपजिल्हाधिकारी, तीन विशेष कार्यकारी अधिकारी, एक कृषी सहसंचालक, एक संचालक, एक तालुका कृषी अधिकारी व गुणनियंत्रण अधिकाऱ्याचे नाव नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कृषी आयुक्तालय व मंत्रालयातील एकूण सहा अधिकाऱ्यांची नावे या यादीत आहेत. त्यात एक सहसंचालक, प्रशासनाधिकारी, अवर सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी व एका आस्थापना अधीक्षकाच्या नावाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com