Team Agrowon
लाल मुळ्याचा वापर सॅलडमध्ये केला जातो. भारतात कुठेही याची लागवड करता येते.
लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते.
जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो.
लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते.