Backyard Garden : आरोग्यदायी पोषक परसबाग

Backyard Ideas : घरातील सर्वांच्या सुदृढ आरोग्यासाठी कमी खर्चात पोषक असा सकस आहार मिळावा यासाठी घराजवळ परसबाग तयार करावी.
Backyard
BackyardAgrowon

आरती देशमुख

The importance of the Backyard :

परसबागेचे महत्त्व

रोज आवडीची ताजी भाजी मिळेल.

आर्थिक बचत होते. आरोग्य चांगले राहते. ताज्या भाजीमुळे आपल्याला दररोज जीवनसत्त्वे, खनिजे मिळतात.

दैनंदिन आहारात आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, कर्बपदार्थ आणि प्रथिने सहज उपलब्ध होऊन कुपोषण कमी करण्यास मदत होते.

गटाने केलेल्या परसबागेच्या उत्पन्नातून सामूहिक लघुउद्योग सुरू करता येऊ शकतो.

आरोग्यदायी भाजीपाला

कर्बोदके : बटाटा, रताळे, घेवडा, सुरण.

कमतरता लक्षणे : त्वचेचा तजेलपणा कमी होतो. पायांना सूज येते.

प्रथिने : वाटाणा, वाल, घेवडा, लसूण, करटुली.

कमतरता लक्षणे : त्वचा, केसांचा रंग बदलतो. चेहरा व पायाचा खालचा भाग सुजतो.

लोह : टोमॅटो, राजगिरा, चवळी, कोबी.

कमतरता लक्षणे : शरीराच्या विविध भागाकडे ऑक्सिजन वाढण्याचे कार्य नीट होत नाही. जीभ, डोळे, त्वचा आणि ओठ अशक्त होतात.

Backyard
Backyard Development : राज्यातील २४ हजार ७४१ परसबागा विकसित

परसबागेचे फायदे

दैनंदिन आहारासाठी कमी पैशात ताजा भाजीपाला उपलब्ध होतो.

घराच्या घरी किमान एक व्यक्तीस वर्षभर रोजगार उपलब्ध होते.

दैनंदिन आहारात आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, कर्बपदार्थ व प्रथिने सहज उपलब्ध होऊन कुपोषण कमी करण्यास मदत होते.

परसबागेमध्ये लागवड

परसबागेसाठी सुपीक जमीन आवश्यक आहे. जमीन अत्यंत हलकी असेल तर वरचा पंधरा-वीस सेंटिमीटरचा थर गाळयुक्त मातीने भरून घ्यावा.पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. पाण्याची उपलब्ध असल्यास उन्हाळ्यात देखील परसबागेद्वारे वर्षभर विविध भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो. हंगामानुसार भाजीपाला पिकाची निवड करणे गरजेचे असते. परसबागेतील पिकांसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, माशांचे खत, तेलबिया पेंडीचा वापर करावा. सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर द्यावा.

जमिनीच्या मशागतीच्या वेळेस शेणखत मिसळावे. ठरावीक अंतर निश्चित केल्यानंतर बियाणे लागवडीसाठी लहान खड्डे तयार करावे. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू आदी पालेभाज्यांच्या लागवडीसाठी गादीवाफे तयार करावेत. बहुवर्षीय फळझाडे किंवा शेवगा लागवडीसाठी दोन बाय दोन फुटांचा खड्डा खोदून घ्यावा.

फळभाजीच्या रोपांची लागवड साधारणतः सायंकाळी करावी. शक्य झाल्यास त्यांना सुरुवातीला दोन, तीन दिवस अर्धे ऊन सावली ठेवावी, म्हणजे रोपे चांगली तग धरतात.

परसबागेला कुंपणाची सोय करावी. त्याजव वेलवर्गीय भाज्यांची लागवड करावी. कुंपणाची आखणी झाल्यानंतर प्रवेशद्वार किंवा दर्शनी भागात एखाद्या फळझाडाची लागवड करावी.

परसबागेमध्ये लोहयुक्त, जीवनसत्त्वयुक्त भाज्यांची लागवड करावी. त्यासोबत एक फळ झाड, एक लिंबू आणि शेवगा रोपाची लागवड करावी.

Backyard
Backyard Creation : परसबाग निर्मितीत महिलांचा सहभाग समाधानाची बाब

लागवडीचे नियोजन

खरीप हंगाम : वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, गावर, चवळी, दोडका, गिलके, कारली, काकडी, दुधीभोपळा, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू, पोकळा.

रब्बी हंगाम : टोमॅटो, पालक, राजगिरा, मेथी, कोथिंबीर, शेपू, वांगी, मिरची, फुलकोबी, गाजर, बीट, कांदा, लसूण,बटाटा, मुळा.

उन्हाळी हंगाम : भेंडी, चवळी, गवार, वांगी, टोमॅटो, घेवडा, भोपळा, कारली, काकडी, पालक.

भाजीपाल्याची दैनंदिन गरज (प्रति व्यक्ती, प्रति ग्रॅम)

भाजी पुरुष महिला लहान मुले

बैठे काम करणारा मध्यम मेहनत करणारा जास्त मेहनत करणारा बैठे काम करणारी मध्यम मेहनत करणारी जास्त मेहनत करणारी १-३ वर्ष ४-६ वर्ष १०-१२ वर्ष (मुले) १०-१२ वर्ष (मुली)

पालेभाज्या ४० ४० ४० १०० १०० १०० ४० ५० ५० ५०

इतर भाज्या ५० ६० ८० ५० ५० ६० १० २० ३० ३०

कंदमुळे ६० ७० ८० ४० ४० १०० २० ३० ५० ५०

आरती देशमुख, ९५०३६१२७०२

(विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, जि.नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com