सुखाची ओंजळ

या ओंजळीत माझ्या, क्षण येती सुखाचे... धरुनी ठेवी मन माझे, या सुंदर आठवणींचे... सुखाचे क्षण
सुखाची ओंजळ

ज्योती आधाट-तुपे

या ओंजळीत माझ्या, क्षण येती सुखाचे... धरुनी ठेवी मन माझे, या सुंदर आठवणींचे... सुखाचे क्षण ओंजळीत आले, की ते सोडून द्यावेसे असे कुणाला वाटेल बरे... पण मनाला एक प्रश्‍न जरूर विचारूयात, की आलेल्या त्या सुखी क्षणांचा आपण तितकासा आस्वाद घेतो का? त्या क्षणांचा भरभरून आनंद लुटतो कां? त्या क्षणांविषयी कृतज्ञभाव ठेवतो का? जर या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे हो असतील तर आपल्याला जगण्याचा अर्थ समजला आहे.

सुखाची ओंजळ
Crop Damage Compensation : सांगलीत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ३५ कोटी वर्ग

कधी कधी असं ही वाटतं, की आपल्या आयुष्यात जे जसं आहे तसं स्वीकारत पुढे पुढे आपण जातो. पण काही गोष्टी अशा असतात, की त्या कुठवर स्वीकारायच्या. मनाने कितीही खंबीर असणारी, सकारात्मकतेने वागणारी माणसेही काही परिस्थितीला सहजासहजी नाही स्वीकारू शकत. याचे मूळ कारण आहे अपेक्षा.

सुखाची ओंजळ
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

अपेक्षा ही बऱ्‍याचदा दुःखाला जन्म घालते. आपल्या मनाप्रमाणे समोरची व्यक्ती वागली की आपण खुश आणि नाही वागली तर आपण दुःखी. असे का पण? समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नसेल तर ती गुन्हेगार आहे का?

समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्यामुळे बदललेली मनःस्थिती, परिस्थिती समजून घेण्याऐवजी आपण स्वतःचा स्वार्थी विचार करत त्या व्यक्तीला अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे, आपल्या म्हणण्याप्रमाणे न वागल्यामुळे दोष देत राहतो.

एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्या व्यक्तीला वागणूक देतो. सुखाची ओंजळ मग अशा प्रसंगी दुःखात परावर्तित होते. आणि जगण्यातला उत्साह कमी होतो. आपली ओंजळ सततच सुखानेही भरलेली नसेल. दुःख, संकटे, संघर्ष येणारच आहेत, पण अशावेळी सुखी क्षण आठवून दुःखी क्षणांवर मात करणे गरजेचे असते. जर असे केले नाही तर जगण्यातली उमेद नाहीशी होते.

सुखाची ओंजळ
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

नाही मिळाले यश एखाद्या बाबतीत लवकर, तर काय फरक पडतो. एखादी घटना नाही मनाप्रमाणे घडली तरी काय फरक पडतो. मानवी जीवन हे विविध अनुभवांनी भरलेले असते. चांगले अनुभव मनात साठवून ठेवून कटू प्रसंगांना सामोरे जाण्यात खरी मजा आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे घडत नसेल, तर शांत मनाने चालत राहूया.

कारण पुढे सुखाची ओंजळ भरलेली आहे असं समजा. त्या सुखी क्षणांचे स्वागत आपण आनंदी राहून करायला हवे. हो पण सुखी क्षण पेलवण्याचीही शक्ती आपल्यात हवी. दोन्हीही अनुभव तितक्याच सामर्थ्याने आपण स्वीकारले पाहिजे. कारण सुख, शांती या गोष्टी मागून मिळत नसतात तर ते स्वतःचे स्वतःलाच आतून अनुभवायचे शिकलो, की आयुष्यात स्थिरता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com