Floriculture : जुन्नर तालुक्यात फुलले बटन फुलांचे मळे

Flower Farming : जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बटन फुलांची लागवड यशस्वी केली आहे. या फुलाला सुपारीचे फूलही म्हणतात. त्याचे इंग्रजी नाव ग्रोमफेना ग्लोबोसा आहे.
Floriculture
Floriculture Agrowon
Published on
Updated on

Pune News : जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बटन फुलांची लागवड यशस्वी केली आहे. या फुलाला सुपारीचे फूलही म्हणतात. त्याचे इंग्रजी नाव ग्रोमफेना ग्लोबोसा आहे. गडद जांभळ्या रंगाची सुपारीच्या आकाराची ही फुले बहुतांशी परसबाग, कुंडीत किंवा घराजवळील बगीचामध्ये पाहावयास मिळायची; पण आता शेतकरी या फुलांची शेती करू लागले असून, सध्या या फुलांचे मळे बहरले आहेत.

चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची बटन फुलांच्या शेतीला पसंती मिळत आहे. सजावटी तसेच हार, तोरणांमध्ये ही बटन फुले मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यास बाजारात मोठी मागणी असून लग्नसराई, सण उत्सवाच्या काळात भावही चांगला मिळतो. रोपवाटीकांमधून या फुलांच्या रोपांना मोठया प्रमाणावर मागणी आहे.

Floriculture
Floriculture Technology : पावसाच्या प्रदेशात यशस्वी पॉलिहाउसमधील जरबेरा

सध्या ही फुले गडद जांभळ्या रंगात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून काही ठिकाणी ती गडद लाल (चेरी) आणि पांढऱ्या रंगातही आहेत, तसेच फुलांची टिकवण क्षमताही चांगली आहे. जमिनीची नांगरणी करून रोटावेटरच्या साह्याने बारीक करून घ्यावी. रिझरच्या सहाय्याने साडेचार ते पाच फूट रुंदीचा व एक ते दीड फूट उंचीचा गादीवाफा तयार करावा. फुले आल्यावर ही झाडे स्वतःचे वजन पेलू शकत नाहीत व झाडे साधारणपणे तीन ते चार फुटांपर्यंत वाढतात व ती पडल्यामुळे फुलांचे नुकसान होते.

Floriculture
Floriculture : नांदेडमधील फूल उत्पादकांना सुविधा पुरविणार

त्यासाठी त्याला आधाराची गरज असते. झाडांना आधार मिळावा यासाठी बांबू, कारव्या, तार वापरून बागेची उभारणी करून सुतळीच्या साह्याने बांधणी करावी. सुपारीच्या पिकावर मुख्यत्वे करपा व कीड या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी तसेच झाडांच्या योग्य वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी फवारणीतून खते व संजीवके द्यावीत. झाडाच्या मजबूतीसाठी व फुलांचा रंग कायम राखण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरॉनची फवारणी करावी. बाजारामध्ये दांडी फुलाला मोठी मागणी असल्याने दांडीसह फुलांची तोडणी करावी.

अशी करा लागवड

गादीवाफ्याच्या मध्यभागी शेणखत किंवा गांडूळ खत टाका

लिबोळी पेंड तसेच रासायनिक खते टाकून ते मातीत मिसळून बेड उभारा

बेडवर ठिबकच्या नळ्या अंथरून अाच्छादन कागद (मल्चिंग पेपर) अंथरावेत

ठिबकच्या साहाय्याने पाणी देऊन दोनही बाजूने दीड फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने लागवड करावी.

लागवड झाल्यानंतर रोपांची वाढ चांगली होऱ्या ह्यूमीकएसिड, ट्रायकोडर्माचे आळवणी द्यावे.

रोप लागवडीनंतर पंधरा दिवसांनी प्रत्येक रोपाचा शेंडा मोडून टाका

खोडातील फुटव्यांची संख्या वाढते व झाड डेरेदार तयार होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com