Crop Damage : शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

Dr. Bharti Pawar : कांद्याचे नुकसान झाले...सगळं वाटोळं झालं, असं म्हणत तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील शेतकऱ्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न शुक्रवारी (ता. १) केला.
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarAgrowon

Nashik News : कांद्याचे नुकसान झाले...सगळं वाटोळं झालं, असं म्हणत तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील शेतकऱ्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न शुक्रवारी (ता. १) केला. अचानक झालेल्या या प्रकाराने डॉ. पवारही अचंबित झाल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शांत करण्याचा प्रयत्न केला.

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार तळेगाव रोही येथे नुकसान पाहणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तळेगाव रोही व परिसरात गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती, त्यात पाणी विकत आणून कांदे व फळबागा जगविण्याच्यी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

Dr. Bharti Pawar
Paddy Crop Damage : नागपुर जिल्ह्यातील धानपट्ट्यात १९७६ हेक्‍टरवर नुकसान

गारपिटीने बागा व कांद्याचे संपूर्ण पीक नष्ट झाले, त्यामुळेच या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.त्याच उद्विग्नतेतून तळेगाव रोही येथील रामदास लक्ष्मण केदारे यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांचे तळेगाव रोही येथे दोन एकर कांद्याचे पीक होते. पाणी कमी असल्याने त्यांनी टँकरने पाणी विकत आणून कांद्याचे पीक जगविले.

त्यासाठी त्यांनी कर्ज काढून हजारो रुपये खर्च केले होते. गारपिटीने कांद्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते होते. सरकारही काही मदत करीत नाही, आता जगून तरी करायचं काय,असं म्हणत त्यांनी चक्क अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना आवरत शांत केले. डॉ.पवार यांनीही शेतकऱ्याला दिलासा देत सरकारकडून लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Dr. Bharti Pawar
Banana Crop Damage : खानदेशात वादळी पावसात केळी बागा भुईसपाट

समस्या सांगा; सरकार दरबारी त्या मांडेल : मंत्री डॉ. पवार

पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर आहे. या परिस्थितीत क्षेत्रीय पातळीवर जाऊन नुकसान पाहण्यासाठी जात आहोत. शेतकरी नुकसान भरपाई व पंचनामापासून वंचित राहू नये हा माझा प्रयत्न आहे. मी एक मंत्री म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांची बहीण म्हणून प्रत्यक्ष बांधावर जात आहे.

शेतकऱ्यांना जे सांगायचे आहे; ते कृपया आमच्याकडे म्हणणे मांडावे. आम्ही सरकार दरबारी ते मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू; मात्र असे अनुचित प्रकार योग्य नाही. शेतकऱ्यांचे दुःख समजू शकते पण योग्य पद्धतीने समस्या मांडल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेऊन दिलासा दिला जाईल याची मी खात्री देते, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com