Dudhganga river : दूधगंगा नदीपात्रात मगरीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Crocodile Attack : दूधगंगा नदीच्या दत्तवाड-सदलगा दरम्यानच्या पात्रात मगरीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. ११) उघडकीस आली. या घटनेत ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Dudhganga river
Dudhganga riverAgrowon

Pune News : दूधगंगा नदीपात्रात मगरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मगरीचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. यामुळे दूधगंगा नदी किणारी असणाऱ्या अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यादरम्यान दूधगंगा नदीच्या दत्तवाड-सदलगा दरम्यानच्या पात्रात मगरीने एका वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. ११) उघडकीस आली आहे. यात महादेव पुन्नापा खुरे या ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून दूधगंगा काठावरील गावांमध्ये पुन्हा एकदा मगरीची दहशत माजली आहे.

या घटनेची मिळालेली माहिती अशी की, यंदा मे महिन्याच्या आधीच पाणी नसल्याने दूधगंगा नदी कोरडी पडली होती. पण दोन दिवसांपूर्वीच धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्र तुडुंब भरले आहे. यावेळी सदलगा येथील शेतकरी महादेव खुरे शुक्रवारी (ता. १०) गावच्या कंटी भागातील आपल्या शेतात काम करत होते. कामानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे नदीत अंघोळ केली. अंघोळीनंतर ते काठावर येत असतानाच त्यांच्यावर मगरीने हल्ला केला. पायाला धरून मगरीने त्यांना मगरीने पाण्यात ओढत नेल्याने प्रथमदर्शनी शेतकरी व ग्रामस्थांनी सांगितले

Dudhganga river
Dudhganga Irrigation : दूधगंगा प्रकल्पातील पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

यानंतर शनिवारी खुरे कुटुंबीयांकडून नदी पात्राच्या शेजारी खुरे यांच्या शोध घेतला जात होता. दरम्यान शनिवारी सकाळी रमेश प्रधाने यांच्या शेताजवळ असणाऱ्या नदीपात्रात महादेव खुरे यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या डाव्या मांडीवर मगरीच्या चाव्याचे व्रण आहेत. खुरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार असून या घटनेची नोंद सदलगा पोलिसांत करण्यात आली आहे.

दरम्यान दूधगंगा नदीच्या दत्तवाड-सदलगा दरम्यानच्या पात्रात मगरींनी उच्छाद घातला असून अनेकदा पात्रात मगरींचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. याआधी सदलगा येथीलच प्रदीप इंगळे या तरुणाला मगरीने हल्ला करून जखमी केले होते. त्यावेळी प्रदीप याने धाडसी प्रतिकाराने मगरीचे डोळे हाताने काढून आपला बचाव केला होता.

Dudhganga river
Smallest River : भारतातील सर्वात छोटी नदी ; विलुप्त झाल्यानंतर लागली वाहू

मगरींचा बंदोबस्त करा

दत्तवाड-सदलगा परिसरात दूधगंगेच्या नदी पात्रात मगरींची दिवसें दिवस संख्या वाढत असून मगरींचा हल्ला वाढत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार होत असून पात्र कोरडे पडल्यानंतर मगरींचा वावर नागरी वस्तीपर्यंत होतो. यातच वारंवार मगरींच्या बंदोबस्ताची मागणी करूनही प्रशासनाकडून यंत्रणा राबवली जात नाही. तसेच त्यांच्याकडे तशी यंत्रणाच नसल्याचे समोर येत आहे. तर अनेकदा शेतकऱ्यांना कृषीपंपाची मोटार सुरू करण्यासाठी जीव मुठीत धरून नदी पात्रासह काठावर जावं लागतं आहे. यामुळे सदलगा परिसरातील शेतकऱ्यांनी मगरींचा बंदोबस्त करा अशी आर्त हाक प्रशासनास दिली आहे.

शेतकऱ्यांचा प्रशासनास प्रश्न

याआधी एका तरूणावर मगरीने हल्ला केला होता. फक्त त्याच्या साहसामुळे तो बचावला होता. पण आता एका वृद्धाचा जीव मगरीने घेतला आहे. यामुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. तसेच याआधी शेळ्या, मेंढ्या, कुत्री, म्हशी, घोडे आदींवर नदी पात्रात मगरींनी प्राणघातक हल्ला केला आहे. यात शेळ्या, मेंड्यांसह म्हशी, घोड्यांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे आता दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांसह सदलगाकरांनी मोठी जीवित हानी झाल्यावरच वनविभाग जागा होणार आहे का असा सवाल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com