Unlicensed Seeds : विनापरवाना बियाण्याच्या विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

Cotton Seeds : विनापरवाना कपाशी बियाणे साठवणूक व त्या बियाण्याची निश्‍चित दरापेक्षा जादा दराने विक्री केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी एका विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Cotton Seeds
Cotton SeedsAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : विनापरवाना कपाशी बियाणे साठवणूक व त्या बियाण्याची निश्‍चित दरापेक्षा जादा दराने विक्री केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी एका विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक जगदीप वाघमारे यांनी वैजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. २४) पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांना अहमदनगरचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनधिकृतपणे व जादा दराने कपाशीच्या संकेत वाणाचे बियाणे वैजापूर तालुक्यामधून स्वामी समर्थ नगर वैजापूर येथून विक्री होत असल्याची माहिती गुरुवारी (ता. २३) दिली होती.

Cotton Seeds
Cotton Seed Sale : कापूस बियाण्यांची ‘ऑन’मध्ये विक्री

त्यानुसार जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. कातोरे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव व श्री. वाघमारे यांनी वैजापूर पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत ठिकाणी कापूस बियाणे तपास कामी पोलिसांची मदत देण्याची विनंती केली. त्यानुसार गुरुवारी साधारणतः साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिस पथकासह श्री स्वामी समर्थनगरमधील एका घरामध्ये दाखल झाले.

तेथे ज्ञानेश्‍वर काकासाहेब काळे (वय ३०) मूळ रा. गुंडेगाव, ता. नांदगाव जिल्हा नाशिक हे भाड्याने राहत असल्याचे आढळून आले. त्यांना विचारपूस करून चौकशी केली असता, त्यांच्या घरामध्ये एकूण २२ पाकिटे कपाशीचे संकेत वाणाचे बियाणे घेऊन ठेवल्याचे आढळून आले.

Cotton Seeds
Cotton Seeds Sale : जादा दराने बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा

त्या सर्व पाकिटांची तपासणी केली असता त्यावर आढळलेला तपशील व त्या पाकिटांची एकूण किंमत १९ हजार ८ रुपये असल्याचे लक्षात आले. श्री. काळे यांना याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी ते बियाणे कृषी दीपक मौनगिरी ॲग्रो कोपरगाव, अहमदनगर या वितरकाकडून घेऊन, वैजापूर तालुक्यातील स्वराज्य ॲग्रो एजन्सी, एमआयटी कॉलेज समोर रोटेगाव वैजापूर, जि. संभाजीनगर यांना देण्यासाठी आणले असल्याचे स्पष्ट केले.

एकूण ४५ पॉकेट्स आणले होते त्यापैकी २३ पॅकेट शेतकऱ्यांना विक्री केल्यास सांगितले. पैकी संबंधितांच्या घराच्या झडतीमध्ये २२ पाकिटे संकेत वाणाचे संकरित कापूस बियाणे आढळून आले. याप्रकरणी बिलाची मागणी केली असता सापडत नसल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली. ज्ञानेश्वर काळे यांनी विनापरवाना कापूस विक्री व साठवणूक केल्याचे आढळून आल्याने बियाणे नियंत्रण आदेशनुसार कारवाई याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी ज्ञानेश्‍वर काळे यांच्या विरोधात नियमानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com