Pune News : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी व किसान सभेच्या पदाधिकारी असे २०० लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. यावरून जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावे, कापूस आणि सोयाबीन हमी भावाने खरेदी करावे, पीक विमा द्यावा, पिक विमा दिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशीत कराव्यात आदी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच सरकारचा निषेध करताना मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. यावरून पोलिस प्रशासनाने गुन्हा नोंद केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावरून आधी धरणे आंदोलने, १३ ते १६ पायी मोर्चा काढण्यात आला होता. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन १६ ऑक्टोंबर रोजी शेतकरी व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले होते. यावेळी ध्वनिक्षेपही लावण्यात आला होता. या आंदोलनासाठी रितसर पोलिस प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र बीड पोलिस जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाने आंदोलनादरम्यान परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा ठपका किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांवर ठेवल्याचा आरोप किसान सभेच्या अजय बुरांडे यांनी केला आहे.
तसेच बुरांडे यांनी किसान सभा पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावरून स्पष्टीकरण देताना सरकारवर निशाना साधला आहे. बुरांडे यांनी, आंदोलन करताना आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. तर आम्ही सरकारकडे कोणतीच वेगळी मागणी केली नव्हती. ध्वनिक्षेपाचा वापर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी केला. पण ध्वनिक्षेपाच्या वापरावरून सरकारने आमच्यासह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मागणे, पीक विम्याच्या संदर्भात मागणी करणे गुन्हा ठरत असले तर शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.