Kisan Sabha : सरकारने केलेल्या प्रत्येक घोषणेचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवावा

Dr. Ajit Navle : सत्तेत असणारी राजकीय मंडळी विविध योजना राबवत राज्यातील जनतेला लाचार बनविण्याचे काम करत आहे. हे सुनियोजित कार्यक्रम सत्तेत असलेल्या धर्मांध, जातीयवादी मंडळी करत आहेत.
Kisan Sabha Beed
Kisan Sabha BeedAgrowon
Published on
Updated on

Beed News : अस्मानी आणि सुलतानी संकटात जीवन मरणाच्या यातना सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाल झेंड्याखाली एकत्र येत शेतकऱ्यांकरिता सरकारने केलेल्या प्रत्येक घोषणाची प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवावा, असा ठराव मंगळवारी (ता. १) माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे किसान सभेच्या पुढाकारातून झालेल्या शेतकरी मेळाव्यात एकमुखाने घेण्यात आला.

बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष झुंजार स्वातंत्र्यसेनानी गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्य तेलगाव येथील वृंदावन मंगल कार्यालय या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन बीड जिल्हा किसान सभेकडून करण्यात आले होते.

या प्रसंगी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले हे प्रमुख वक्ते, अध्यक्षस्थानी काशीराम सिरसाट, स्वागताध्यक्ष दत्ता डाके, किसान सभेचे जिल्ह्याध्यक्ष ॲड. अजय बुरांडे, विठ्ठलदादा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Kisan Sabha Beed
Government Agriculture Award : अकोल्यातील शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कारांनी सन्मान

नवले म्हणाले, की सत्तेत असणारी राजकीय मंडळी विविध योजना राबवत राज्यातील जनतेला लाचार बनविण्याचे काम करत आहे. हे सुनियोजित कार्यक्रम सत्तेत असलेल्या धर्मांध, जातीयवादी मंडळी करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री हे देशात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. याच जिल्ह्यातील शेतकरी आजमितीस अस्मानी आणि सुलतानी संकटात मरण यातना भोगत आहेत.

बीड जिल्ह्यातील पीकविमा प्रकरण मागील अनेक वर्षांपासून किसान सभा उचलून धरत असून पीकविमा वाटप याद्या प्रकाशित करण्यात येत नाहीत. राज्याच्या मंत्र्यांनी शेती, शेतीचे ज्ञान, कृषिमूल्य आयोग, आयोगाची कर्तव्य आणि जबाबदारी, आधार भाव, भावांतर, राज्याची आणि केंद्राची याबाबत भूमिका संभ्रम निर्माण करणारे आहे.

Kisan Sabha Beed
Agriculture Department : कृषी सेवेच्या पदांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

बीड जिल्ह्यातील पीकविमा पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावा. विमावाटप केलेल्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यात याव्यात, सरकारने केलेल्या घोषणांनी तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी सोयाबीन कापसाच्या हमीभावाकरिता किसान सभेकडून शुक्रवारपासून (ता. ४) याच तेलगाव चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. बुरांडे यांनी केले. या स्वागताध्यक्ष दत्ता डाके यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात राज्य सरकार शेती पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कष्टकरी, शेतकरी यांना घामाचा मोबदला हमीभावाच्या माध्यमातून द्यायचा नाही. त्यांना स्वाभिमानाने जगू न देता लाडक्या योजना राबविण्याचे काम सरकार करत आहे. शेती, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, रोजगार या बाबतीत सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नाना प्रकारे भावनिक राजकारण करण्यात सत्तेतील लोक, शासकीय यंत्रणा आणि सरकारी पैसा खर्च करत आहेत.
- डॉ. अजित नवले, किसान सभेचे राज्य सचिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com