Agriculture Department : राज्याच्या कृषी खात्यात ९००० पदांचा अनुशेष

Vacancies In Agriculture Department : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून ९००० पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून ९००० पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बाबत कोणीच गंभीर नसल्याने ही पदे केव्हा भरल्या जातील या बाबत देखील अनिश्‍चितता आहे. या संदर्भाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील विविध आस्थापनांवर राज्यभरात २७ हजार ५०२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र सद्यःस्थितीत केवळ १८ हजार ३६९ कर्मचारीच कार्यरत आहेत. तर ९ हजार १३३ पदांवर नियुक्त्याच झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे कृषी विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा दररोज प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संबंध येतो, अशाच ‘गट-क’मधील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : अनियमितता आढळल्याने ३० कृषी केंद्रांचे परवाने कायम रद्द

त्यांची संख्या तब्बल ५ हजार ५६५ इतकी प्रचंड आहे. त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक (७३), कृषी सहायक (१६९३), अधीक्षक (५८) यांच्यासोबतच लिपिक, टंकलेखक, अनुरेखक, वाहनचालकांचा समावेश आहे. तर ‘गट-ड’मधील नाईक, शिपाई (१९८९), क्लीनर, माळी (५५९), प्रशिक्षित मजूर (२९९), मदतनीस, परिचरांचीही वाणवा आहे. गंभीर बाब म्हणजे, डिसेंबर २०२४ पर्यंत राज्याचे कृषी आयुक्त पदही रिक्तच होते.

जानेवारीत सूरज मांढरे यांना आयुक्त पद देण्यात आले. मात्र आयुक्तांसोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर निर्णय घेण्याची क्षमता असलेली संचालक, सहसंचालक ही महत्त्वाची पाच पदे अद्यापही रिक्त आहेत. प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी, कृषी अभियंता ही पदे भरलेली नसल्याने कृषी क्षेत्राशी संबंधित कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.

Agriculture Department
Agriculture Department: कृषी विभागात महिलाराज! राज्यात २८.८५% महिला कर्मचारी कार्यरत

तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ वादग्रस्त गेला. नवनियुक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विभागनिहाय बैठका घेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत असले तरी रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आली आहे. परिणामी, कृषी विभाग शेतकऱ्यांना कसा न्याय देईल, या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागातील रिक्त पदे

संवर्ग : मंजूर पदे : भरलेली पदे : रिक्त पदे

- गट अ : २८४ : २४७ : ३७

- गट ब : २५५७ : १९९४ : ५६३

- गट क : २०५४३ : १४९७८ : ५५६५

- गट ड : ४११८ : ११५० : २९६८

- एकूण : २७५०२ : १८३६९ : ९१३३

सरकार, ही रिक्त पदे कधी भरणार?

संचालक १, कृषी सहसंचालक ४, अधीक्षक कृषी अधिकारी ९, प्रशासकीय अधिकारी ३, लेखा अधिकारी ११, स्वीय सहायक ६, कृषी अधिकारी ३९८, कृषी कनिष्ठ अभियंता ८, कृषी पर्यवेक्षक ७३, कृषी सहायक १६९३, अधीक्षक १६, सहायक अधीक्षक ४२, वरिष्ठ लिपिक १३१, लिपिक/टंकलेखक १०९१, आरेखक ३४, अनुरेखक १९००, सहायक ग्रंथपाल १, लघुलेखक (उच्चश्रेणी) ८, लघुलेखक (निम्नश्रेणी) ५२, लघुटंकलेखक ५२, वाहनचालक ४७१, मशीनमन १, टिलर ऑपरेटर १५, नाईक/दप्तरी ७२, शिपाई/रखवालदार १९८९, क्लीनर १३, माळी/रोपमळा मदतनीस ५५९, प्रशिक्षित मजूर २९९, प्रयोगशाळा सहायक/परिचर २१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com