Agriculture Department: कृषी विभागात महिलाराज! राज्यात २८.८५% महिला कर्मचारी कार्यरत

Female Officers: राज्यातील कृषी विभागात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढत आहे. सध्या विभागात २८.८५% महिला अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी महिलांची मोठी भूमिका ठरत आहे. विशेषतः ‘शेतकरी प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून महिला अधिकारी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाकडे मुलींचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कृषीचे शिक्षण घेतल्यानंतर कृषी क्षेत्राकडे अनेक महिला वळत आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागात काम करणाऱ्या महिला वर्गाचा टक्का वाढला आहे. राज्यात इतर विभागांपैकी कृषी विभागात सर्वाधिक २८.८५ टक्के महिला काम करत असल्याने शेतकरी वर्गासाठी लोकाभिमुख असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच मदत होत आहे.

कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी काम करणारा विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी आवश्यक आहे. सद्यःस्थितीत राज्यात एकूण १९ हजार २४० अशा पुरुष, महिला अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यापैकी ५ हजार ५५१ महिला कर्मचारी असून त्यांचा २८.८५ टक्का एवढा आहे. या विभागात महिला अधिकारी, कर्मचारी वर्गाचा टक्का वाढल्याचे बोलले जात आहे.

Agriculture Department
Agriculture Department : साताऱ्यात ८३४ कृषिमित्र नियुक्त, पण निधीअभावी काम ठप्प

कृषी शिक्षण झाल्यानंतर एमपीएससीमार्फत, कृषी सेवकांच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कृषी विभागात रिक्त झालेल्या पदांवर निवड केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागात महिलांचे प्रमाण वाढत आहे. निवड झाल्यानंतर गट अ वर्गामध्ये संचालक, सहसंचालक, एसएओ, उपसंचालक, गट ब वर्गामध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी, गट क वर्गामध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक,

लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहायक अधिकारी, लघुटंकलेखक, अनुरेखक, आरेखक तर गट ड वर्गामध्ये शिपाई, रोपमाळी मदतनीस, नाईक, मजूर अशा विविध पदांवर महिला सध्या काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्यात गट क वर्गामध्ये महिला अधिकारी, कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. सुमारे चार हजार ७४९ महिला कर्मचारी असून, त्याची टक्केवारी ३० एवढी आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी संचालकांना सकाळी पदोन्नती, संध्याकळी सेवानिवृत्ती

त्यापाठोपाठ गट ब वर्गामध्ये ४७६, तर गट ड वर्गामध्ये २५९, तर गट अ वर्गामध्ये ५७ महिला अधिकारी कार्यरत आहे. यातील अनेक महिला या कृषी विभागातील विविध योजनांमध्ये काम करत असून, काही महिला योजनेच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहे.छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी निभा डाहाके म्हणाल्या, की मी कायम ‘शेतकरी प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून काम करत आले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशीच प्रत्येक योजना, उपक्रम राबवण्याचा माझा प्रयत्न असतो.

कृषी विभागात गट अ ते गट ड संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या महिला

संवर्ग एकूण संख्या महिला अधिकारी-कर्मचारी टक्केवारी

गट अ ३८५ ५७ १४.८१

गट ब २४०० ४७६ १९.८३

गट क १५,४४३ ४७५९ ३०.८२

गट ड १०१२ २५९ २५.५९

एकूण १९,२४० ५५५१ २८.८५

कृषी विभागात विविध पदांवर कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी : उज्ज्वला बानखेले, अर्चना कडू, डॉ. विद्या मानकर, ऊर्मिला रजपूत, सुनंदा कुऱ्हाडे, पूनम खटावकर, प्रीती हिरळकर, भाग्यश्री फरांदे, मनाली तांबडे, सुप्रिया शिळीमकर, क्रांती चौधरी, कविता आंडगे, मनीषा तागड, छाया देशमुख, डॉ. प्रीती सावाईराम, अरुणा लांडे, अर्चना शिंदे, स्वाती हासे.

आत्मा विभागातील प्रकल्प उपसंचालक ते संपादक, शेतकरी मासिक अशा विविध पदांवर काम करण्याचे भाग्य लाभले. या पदांवर काम करत असताना एकच ध्येय कायम समोर ठेवून सेवा दिली ते म्हणजे ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’. माझ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी सतत तत्पर राहून काम करण्याची सन्मती कायमच राहील.
पूनम खटावकर, कृषी उपसंचालक, शेतकरी मासिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com