Team Agrowon
राज्यात अनेक ठिकाणी शेतीमाल एकाच वेळी बाजारपेठेत येतो आणि बाजार भाव गडगडतो. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होतं. पण साठवणुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
हाचविचार करून कृषि पणन मंडळाकडून 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात आपला शेतमाल ठेवता येतो. शेतमालाच्या एकुण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येतं. आता पर्यंत एकुण रू. २४८३१.७३ लाख इतके तारण कर्जाचे वाटप करण्यात आलं आहे.
शेतात जर सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका व गहू पिकासाठी एकूण किंमतीच्या ७५% रक्कम ही कर्ज म्हणून मिळते. याची मुदत ६ महिने असून व्याज ६ टक्के आहे.
कोकणातील शेतकऱ्यासाठीही हा निर्णय चांगला असून काजू बीला देखील ७५% रक्कम कर्ज म्हणून दिलं जातं. जी ७५% रक्कम किंवा रु.१००/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाते. याचाही व्याज दर ६ टक्के आणि कालावधी ही ६ टक्के आहे.
सुपारीसाठीही चांगली योजना असून यालाही एकूण किंमतीच्या ७५% रक्कम किंवा रु.१००/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाते. याचाही व्याज दर ६ टक्के आणि कालावधी ही ६ टक्के आहे.
नाशिकसह सांगली जिल्ह्यातील द्राक्ष आणि बेदाना उत्पादकांना देखील एकूण किंमतीच्या ७५% रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. यालाही व्याज दर ६ टक्के आणि कालावधी ही ६ टक्के आहे. अधिक माहितीसाठी https://www.msamb.com/Schemes/PledgeFinance