
Nagpur Crop Damage : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ९ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. संप काळातही महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले.
प्राथमिक सर्वेक्षणात सात हजारांवर पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. अंतिम अहवालात हा आकडा ४ हजार ४४१ हेक्टर होता. दरम्यानच्या काळात शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली. खरीप हंगामात अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला.
काहीसे पीक हातात आले. परंतु भाव नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. रब्बीत चांगले पीक होण्याची अपेक्षा होती. परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीने त्यावर पाणी फेरले. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा होती.
मार्च महिन्यात ४ हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मार्च महिन्यात झालेल्या नुकसानासाठी मदत देण्यासाठी १० एप्रिल शासनाने आदेश काढला. परंतु यात नागपूर जिल्ह्याचा समावेश नव्हता.
उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा मदतीतून वगळण्याच्या विरोधात कॉँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. आता शासनाने नुकसानीपोटी ९ कोटी ७ लाख ४५ हजार ७०० रुपयांची निधी मंजूर केला आहे.
असा मिळणार निधी
तालुका- एकूण बाधित क्षेत्र- बाधित शेतकरी - मदत रक्कम
काटोल - १०३९ - १४४३ - २,२७,३९,५००
ना. ग्रामीण- १- २- ८५००
पारशिवणी - १२ - २१ - २,१५,०००
कळमेश्वर - २९९०.३५ - ३४८४- ६,१०,९६,४७५
मौदा - ५०.१० - ८८ - ८,६१,६००
रामटेक- २४१.३५- ११७- ३८,७९,८२५
सावनेर - १०७ - ११७- १९,४४,८००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.