Smart Irrigation : एआय आधारित स्मार्ट सिंचन पद्धतीचे फायदे

Team Agrowon

कृत्रिम बुद्धिमत्ता

शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता ही सातत्याने कमी होत चालली आहे. ‘प्रति थेंब अधिक उत्पादन’ घेण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा, त्यातही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पद्धतींचा अवलंब करण्याची गरज वाढत आहे.

Smart Irrigation | Agrowon

स्मार्ट सिंचन

स्मार्ट सिंचन म्हणजे पिकांची पाण्याची नेमकी गरज, हवामानातील विविध घटक, माती किंवा माध्यमाची क्षमता याचा विचार करून दिले गेलेले पाणी होय.

Smart Irrigation | Agrowon

जलसंधारण

कृत्रिम बुद्धिमत्तेवर संचालित स्मार्ट सिंचन पद्धती जमिनीतील आर्द्रता पातळी, हवामानाची परिस्थिती आणि वनस्पतींच्या आवश्यकतांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत अल्गोरिदमचा फायदा घेतात. 

Smart Irrigation | Agrowon

वाढलेले पीक उत्पादन

पिकाच्या वाढीसाठी जास्तीत जास्त आदर्श स्‍थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असते. त्यामुळे उपलब्ध जल व अन्य संसाधनामध्येही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पिकांचे व्यवस्थापन करणे शक्य होते.

Smart Irrigation | Agrowon

उत्पादनाची प्रत सुधारते

एआय तंत्रज्ञानाद्वारे तापमान, जमिनीची स्थिती, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यासह अनेक घटकांचे विश्लेषण करून प्रत्येक रोपाला आदर्श स्थितीत संसाधने उपलब्ध केली जातात.

Smart Irrigation | Agrowon

ऊर्जा वापराची कार्यक्षमता वाढते

एआय आधारित स्मार्ट सिंचन पद्धती पाण्याची मागणी आणि हवामानाच्या अंदाजानुसार पाणी देण्याचे वेळापत्रक ठरवले जाते.

Smart Irrigation | Agrowon

खर्चात बचत

एआय आधारित स्मार्ट सिंचन पद्धतीमुळे सिंचन प्रक्रिया संपूर्ण स्वयंचलित होते. त्यासाठी आवश्यक माणसांची गरज कमी होते.

Smart Irrigation