Agriculture Graduation
Agriculture GraduationAgrowon

Agriculture Education : राज्यातील केंद्रीभूत प्रवेश फेरीची ९ केंद्रे रद्द

Agriculture Graduation : कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी घेतली जाणारी केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी (स्पॉट अॅडमिशन राउंड) राज्यात आता केवळ चार ठिकाणी होईल.
Published on

Pune News : कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी घेतली जाणारी केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी (स्पॉट अॅडमिशन राउंड) राज्यात आता केवळ चार ठिकाणी होईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने यंदा इतर ९ केंद्रे रद्द केली आहेत.

केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी प्रमाणापेक्षाही जास्त केंद्रांवर घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका केंद्रावर कमी महाविद्यालये उपलब्ध होत असत. ही समस्या हटविण्यासाठी यंदा मात्र केवळ चार कृषी विद्यापीठांच्या मुख्यालयात फक्त चार केंद्रांवर केंद्रीभूत प्रवेश फेरी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परिणामी, एकाच केंद्रावर उपलब्ध होणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढेल.

त्यामुळे महाविद्यालय निवडीसाठी विद्यार्थ्यांना अधिक सुविधा मिळतील. केंद्रीभूत प्रवेश फेरी संपताच रिक्त जागा शिल्लक जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. रिक्त जागा भरण्याचा अधिकार महाविद्यालयांना असतो.

त्यासाठी २ ते ११ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक महाविद्यालयांमध्येच प्रवेश फेऱ्या होतील. कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांमधील संस्थात्मक कोट्याचे प्रवेश २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान होतील.

Agriculture Graduation
Agriculture Graduate Recruitment : कृषी पदवीधरांना नोकरभरतीची प्रतीक्षा

राज्यभरातील १७ हजार ९०६ जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आता बदलले आहे. विद्यार्थी agri2024.mahacet.org या संकेतस्थळावर येत्या २२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरू शकतीस.

सुधारित वेळापत्रकानुसार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अंतरिम गुणवत्ता यादी २६ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. यादीवर असलेल्या हरकती दाखल करण्यासाठी २७ ते २९ जुलै असे दोन दिवस देण्यात आले आहे. हरकतींवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलैस प्रसिद्ध होईल.

पदवी प्रवेशाच्या यंदा तीन प्रवेश फेऱ्या (कॅप राउंड) होतील. प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्रपणे महाविद्यालयाचे पसंतीक्रम मागवले जातील. ही कार्यपद्धती चालू शैक्षणिक वर्षापासून प्रथमच सुरू करण्यात आली आहे. पसंतीक्रम देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

Agriculture Graduation
Agriculture Graduate Protest : परभणीत कृषी पदवीधरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा कालावधी १ व २ ऑगस्ट असा आहे. त्यामुळे पहिली प्रवेश वाटप यादी ४ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा कालावधी ५ व ७ ऑगस्ट असा राहील.

यानंतर ८ ऑगस्टला दुसरी प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पुन्हा १६ व १७ ऑगस्ट रोजी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर तिसरी प्रवेश वाटप यादी १९ ऑगस्टला प्रसिद्ध होईल.

महाविद्यालयांचा दर्जा विचारात घ्या

कृषी पदवीसाठी कोणत्याही कृषी महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचा दर्जा, तेथील वार्षिक शुल्क विचारात घ्यावे. त्यानंतर महाविद्यालयाचे पसंतीक्रम द्यावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने त्यासाठी माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com