Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा खरिपात साधारण ७ लाख २ हजार हेक्टरवर खरिपात पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज होता. त्यापैकी आतापर्यंत ५ लाख ६ हजार २२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची लागवड सरासरीच्या पुढे गेली आहे. १ लाख २६ हजार २८० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. नगर जिल्ह्यात सरासरीच्या ८७.३१ टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात खरिपात यंदा ५ लाख १ हजार ४७४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात खरिपात ५ लाख ८६ हजार ३५८ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या तीन वर्षांत खरिपात झालेली पेरणी, कापूस लागवडीच्या अनुषंगाने यंदा खरीप पेरणी होईल, असे गृहीत धरून खरिपासाठी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
प्रमुख पीक असलेल्या बाजरीच्या क्षेत्रात वरचेवर घट होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ८३ हजार हेक्टरवर बाजरी पेरली होती. यंदा त्यात १७ हजार हेक्टरची अधिक भर पडेल, असा अंदाज आहे. कापसाची गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४१ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा त्यात काही प्रमाणात भर पडेल, असा अंदाज असून आतापर्यंत कापसाची १ लाख २६ हजार २८० हेक्टरवर लागवड झाली आहे.
सोयाबीनची गतवर्षी १ लाख ८८ हजार ८५९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आतापर्यंत १ लख १६ हजार ४७७ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १३३ टक्के पेरणी झाली आहे. मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्रही गतवर्षीपेक्षा वाढेल, असा अंदाज बांधून कृषी विभाग नियोजन केले. मुगाची ३८ हजार म्हणजे सरासरीच्या ८० टक्के, उडदाची ५२ हजार ७२९ म्हणजे सरासरीच्या १३० टक्के, तुरीची ५६ हजार ९२१ म्हणजे सरासरीच्या १५७ टक्के पेरणी झाली आहे.
लागवड क्षेत्र (हेक्टर)
भात ३,७२५
बाजरी ६१,३७२
नाचणी ३
मका ४६,५५०
तूर ५६,९२१
मूग ३८,०६१
उडीद ५७,७२९
भुईमूग २८७२
तीळ ३४,
कारळे १९
सूर्यफूल ६९
सोयाबीन १,१६,४७७
कापूस १,२६,२८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.