Sugar Export : कोल्हापूर विभागातून होणार ८४ लाख टन साखर निर्यात; ३२ साखर कारखान्यांना निर्यातीला परवानगी

Sugar Rate : केंद्र सरकारने देशभरातील कारखानानिहाय साखरेचा कोटा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon
Published on
Updated on

Sugar Qouta Central Government : केंद्र सरकारकडून नुकताच साखरेचा कोटा जाहीर करण्यात आला. यामध्ये निर्यातीसाठी जाहीर केलेल्या १० लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल ३.७५ लाख टन साखर उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने देशभरातील कारखानानिहाय साखरेचा कोटा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ही साखर निर्यात करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, निर्यात साखरेपैकी कोल्हापुरातील २० कारखान्यांना मिळून ५४ हजार ५९८ टन, तर सांगली जिल्ह्यातील ११ कारखान्यांना ३० हजार ३८५ टन साखर निर्यातीचा कोटा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ६ हजार ८६२ टन कोटा हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याला, तर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ३ हजार ६४० टन कोटा वसंतदादा साखर कारखान्याला मिळाला आहे.

यापूर्वीच्या २ हंगामांतील म्हणजे २०२१-२२ व २०२२-२३ या हंगामात उत्पादित केलेल्या एकूण साखरेच्या ३.१७ टक्के साखर निर्यात करता येणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यांचा कोटा जाहीर करण्यात आला. गेल्या ३ वर्षांत साखर हंगाम घेतलेलेच कारखाने यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.

Sugar Export
Farmers Justice: बांधावरच्या न्यायातून रस्ते मोकळे; तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकाराने २० दिवसांत ६ वाद मिटले!

या निकषानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पैकी सर्व तर सांगली जिल्ह्यातील १६ पैकी ११ कारखान्यांना निर्यात साखरेला परवानगी मिळाली आहे. याशिवाय ज्या कारखान्यांनी केंद्र सरकारच्या २६ जुलै २०२४ च्या आदेशाचे उल्लंधन केले आहे, त्या कारखान्यांनाही यातून वगळण्यात आले आहे.

कोल्हापूर कारखान्याचे नाव मिळालेला कोटा (आकडे मे. टनात)

कोरे-वारण ४३७७, पंचगंगा-इचलकरंजी ३४८७, कुंभी २४९४, बिद्री ३३२३, भोगावती १४५९, दत्त-शिरोळ ४४१६, नलवडे-गडहिंग्लज ३८६, शाहू-कागल ३६१६, दालमिया-आसुर्ले ४१३३, राजाराम-बावडा १५३३, आजरा-गवसे १२४१, गायकवाड-सोनवडे १५७६, मंडलिक-हमीदवाडा १७७९, शरद-यड्राव २३१३, तांबाळे १३७२, हेमरस-चंदगड २७०८, फराळे ५१७, दौलत-चंदगड १४७९, जवाहर-हुपरी ६८६२, सरसेनापती-कापशी २५७२, गुरूदत्त-टाकळीवाडी २४५५.

सांगलीतील कारखान्याचे नाव मिळालेला कोटा (आकडे मे. टनात)

वसंतदादा-सांगली ३६४०, राजारामबापू-साखराळे ३४८६, नाईक-शिराळा २१६८, हुतात्मा किसनवीर २०६१, यशवंत-नागेवाडी ४८०, राजारामबापू-२ -२०५९, कासेगांव २०७९, कुंडल ३४९१, श्री श्री शुगर २०५८, युटोपियन १२३०, श्रीपती शुगर ६३३.

साखर निर्यातीसाठी या असतील अटी

१० लाख टन कोटा देशातील ५७९ कारखान्यांत विभागला आहे.

दिलेला कोटा कारखाने स्वतः किंवा व्यापारी निर्यातदारांमार्फत निर्यात करू शकतील.

३० सप्टेबर २०२५ पूर्वी साखर निर्यात करावी लागेल.

ज्यांना निर्यात करावयाची नाही त्यानी आपला कोटा ३१ मार्च २०२५ च्या आत परत करणेचा आहे.

कारखाने आपला कोटा दुसऱ्या कारखान्यास अंतर्गत कोट्याच्या बदल्यात आगाऊ मंजुरीने देऊ शकणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com