Sugar Production : पाच जिल्ह्यांत ८३ लाख ६८ हजार क्विंटल साखर उत्पादन

Sugarcane Season : पाच जिल्ह्यांत २२ कारखान्यांनी २० मार्चपर्यंत ९४ लाख २३ हजार ९५३ टन साखर उत्पादनातून ८३ लाख ६८ हजार ८१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.८८ टक्के राहिला.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत २२ कारखान्यांनी २० मार्चपर्यंत ९४ लाख २३ हजार ९५३ टन साखर उत्पादनातून ८३ लाख ६८ हजार ८१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.८८ टक्के राहिला.

छत्रपती संभाजी नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत यंदाच्या ऊस गाळाप हंगामामध्ये सहभागी २२ कारखान्यांमध्ये १३ सहकारी व ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी कारखान्यांनी ४२ लाख ९१ हजार ४८७ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.२८ टक्के साखर उताऱ्याने ३५ लाख ५३ हजार ५०१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugar Factory
Sugarcane Production : साखर उत्पादनात कोल्हापूर आघाडीवर, यंदाच्या गळीत हंगामात उताऱ्याची टक्केवारी वाढली

दुसरीकडे ९ खासगी कारखान्यांनी ५१ लाख ३२ हजार ४६५ उसाचे गाळप करत सरासरी ९.३८ टक्के साखर उताऱ्याने ४८ लाख १५ हजार ३११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. नंदुरबार जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ९ लाख ४४ हजार हजार ६३८ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ३१ हजार १४९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी १ लाख ९१ हजार १९७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.१ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ७३ हजार ९७७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugar Factory
Sugarcane Crushing : बारा कारखान्यांकडून ४७ लाख ९३ हजार टनांवर ऊस गाळप

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १८ लाख ५१ हजार ७७२ टन उसाची गाळप करत सरासरी ९.६५ टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ८७ हजार ४९१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला.त्यामध्ये ५ सहकारी तर २ खासगी कारखान्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील सातही कारखान्यांनी ३९ लाख २१ हजार ७७३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.१७ टक्के साखर उताऱ्याने ३२ लाख ५ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

११ कारखाने बंद

पाचही जिल्ह्यांत यंदाच्या ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या बावीस कारखान्यांपैकी २० मार्च अखेरपर्यंत ११ कारखान्यांचा गाळप हंगाम थांबला आहे. त्यामध्ये जळगाव मधील २, नंदुरबारमधील २, जालनामधील १, बीड मधील ३ व छत्रपती संभाजीनगरमधील ३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात संपूर्ण ऊस गाळप अंती काही ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियोजन केल्याचे साखर विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात किती तत्पर अंमलबजावणी नियोजनाची होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com