Yeldari Dam
Yeldari DamAgrowon

Yeldari Dam : येलदरी धरणामध्ये ६२.२८ टक्के जिवंत पाणीसाठा

Parbhani Rain Update : यंदा १ जूनपासून सोमवार (ता. २) पर्यंत धरणाच्या क्षेत्रात ६११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेला ७३२ मिलिमीटर पाऊस झाला होता.
Published on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणात सोमवारी (ता. २) सकाळी होता. सिध्देश्वर धरणात ७९.३३८ एमएमक्युब (९८ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. यंदा १ जूनपासून सोमवार (ता. २) पर्यंत धरणाच्या क्षेत्रात ६११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेला ७३२ मिलिमीटर पाऊस झाला होता.

यंदा धरणाच्या जलाशयात एकूण ८१.८६७ एमएमक्युब पाण्याची आवक झाली. त्यात गेल्या २४ तासात ०.२८३ एमएमक्युब आवक झाली आहे. प्रतिदिन जिंतूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.५८१ एमएमक्युब, परभणी शहर पाणी पुरवठा योजनेसाठी ३.३२० एमएमक्युब, सेनगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.१६६ एमएमक्युब पाणीपुरवठा केला जातो.

Yeldari Dam
Pune Dam Water : पुण्यातील १२ धरणे शंभर टक्के भरली

येलदरी धरणाच्या खालच्या भागातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणामध्ये सोमवारी (ता. २) सकाळी ७९.३३८ एमएमक्युब म्हणजेच ९८ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला या धरणात ८०.१६२ एमएमक्युब (१०० टक्के) पाणीसाठा होता.

Yeldari Dam
Water Storage In Yeldari Dam: मराठवड्यातील येलदरी, सिद्धेश्वर धरणात किती पाणीसाठा?

यंदा धरण क्षेत्रात १ जून पासून आजवर ७८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी १०१३ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा धरणात १०४.५९० एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे. ०.०१५ एमएमक्युब पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पाणीसाठ्यात जेमतेम २.५ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पाण्याची आवक कमी असल्यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात यंदा जेमतेम २.५ टक्के वाढ झाली आहे. हे धरण अद्याप ३८ टक्के रिकामे आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिवंत पाणीसाठ्यात गुरुवार (ता. २१ सप्टेंबर) च्या तुलनेत ०.८५ टक्के वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com