Water Storage Ujani Dam : उजनी धरणात ८१ टक्के पाणीसाठा; उन्हाळ्यात शेतीसाठी दोनदा मिळणार पाणी

Ujani Dam Water : रब्बी पिकांसाठी ४ जानेवारीपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन ३५ दिवस सुरू राहणार आहे.
Water Storage Ujani Dam
Water Storage Ujani Damagrowon
Published on
Updated on

Ujani Dam Water Solapur : रब्बी पिकांसाठी ४ जानेवारीपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन ३५ दिवस सुरू राहणार आहे. शेतीसाठी सोडलेले पाणी १० फेब्रुवारी रोजी बंद केले जाणार आहे. सध्या धरणात ४३.५० टीएमसी (८१ टक्के) पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवर यंदा रब्बीची पेरणी झाली आहे. उजनीच्या पाण्याचा आधार दीड लाख हेक्टरपर्यंत आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १ ते १९ जानेवारीपर्यंत धरणातील पावणेआठ तर मागील अडीच महिन्यात साडेपंधरा टीएमसी पाणी कमी झाले आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुकतेच भीमा नदीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता शेतीसाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले आहे.

दरम्यान, सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम अजून पूर्ण झाले नसून ती जलवाहिनी कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आणखी एकदा भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल. तर धरणातील पाणीसाठा उणे २० टक्के होईपर्यंत कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडता येते. उन्हाळ्यात मार्चअखेर व मे महिन्यात अशी २ आवर्तने शेतीसाठी सोडावे लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यतेखालील बैठकीत असे नियोजन करण्यात आले आहे.

Water Storage Ujani Dam
Solapur Regional Joint Director : प्रादेशिक सहसंचालक जागेवर नसल्याने खुर्चीला घातला हार ; ऊसदराचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या ‘रयत’ कडून गांधीगिरी

सोलापूर शहरासाठी आणखी १ आवर्तन

सोलापूर ते उजनी या ११० किमी समांतर जलवाहिनीच्या कामाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती, तरीदेखील काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी उजाडणार आहे. टेंभुर्णी बायपासजवळील काम आता सुरू झाले आहे. पण वडाचीवाडी व देवडीजवळ राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ (एनएचएआय) व शेतकऱ्याचा वाद न मिटल्याने महापालिकाच आता तेथील शेतकऱ्यांना मोबदला देऊन जलवाहिनीचे काम पूर्ण करणार आहे. असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

काम पूर्ण झाल्यावर २-३ महिने प्रात्यक्षिक (ट्रायल) होईल. त्यानंतर त्यातून सोलापूर शहरासाठी नियमित पाणी उपसा सुरू होईल. तोपर्यंत आणखी एकदा उजनीतून भीमा नदीद्वारे औज-चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडावे लागणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com