Onion Rate : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ८०० ते ३२६० रुपये दर

गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७० हजार ७४८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ८००, कमाल ३,२६० तर सर्वसाधारण रुपये २,४८७ प्रती क्विंटल राहीले.
Onion Rate
Onion RateAgrowon

लासलगाव, जि. नाशिक : गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon APMC) मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७० हजार ७४८ क्विंटल आवक (Onion Arrival) होऊन बाजारभाव (Onion Rate) किमान ८००, कमाल ३,२६० तर सर्वसाधारण रुपये २,४८७ प्रती क्विंटल राहीले.

Onion Rate
Market Committee : नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : गहु (३६६ क्विंटल) भाव १,५०० ते ३,४०१ सरासरी २,७७२ रुपये, बाजरी लोकल (११३ क्विंटल) भाव १,८०० ते ३,१०१ सरासरी २,३४१ रुपये, ज्वारी लोकल (०९ क्विंटल) भाव १,९०१ ते २,९०० सरासरी २,२८४ रुपये,

हरभरा लोकल (५१ क्विंटल) भाव ३,५०० ते ५,८७१ सरासरी ४,४८४ रुपये, हरभरा जंबु (३१ क्विंटल) भाव ३,७७५ ते ६,५०१ सरासरी ५,१९० रुपये, हरभरा काबुली (७४ क्विंटल) भाव ३,८०० ते ७,९०१ सरासरी ६,२३७ रुपये, सोयाबीन (२०,४१२ क्विंटल) भाव ३,००० ते ५,४५१ सरासरी ५,२०५ रुपये, मूग (११२ क्विंटल) भाव ३,००० ते ८,५३० सरासरी ८,०७० रुपये, मका (१०,८७५ क्विंटल) भाव १,५०० ते २,१४२ सरासरी २,०४२ रुपये प्रती क्विंटल राहीले.

Onion Rate
Milk FRP Committee ची एकही बैठक नाही|Milk FRP|Agrowon| ॲग्रोवन

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव : उन्हाळ कांदा (७,२८० क्विंटल) भाव रुपये ८०० ते २,७७५ सरासरी रुपये २,४२१, सोयाबीन (१०,४२३ क्विंटल) २,४०० ते ५,५१७ सरासरी ५,२०० रुपये, मका (५५५ क्विंटल) १,८०१ ते २,१८१ सरासरी २,१३२ रुपये, बाजरी (०२ क्विंटल) २,२०१ ते २,५३२ सरासरी २,४०१ रुपये, गहू (१११ क्विंटल) २,२०० ते २,७९१ सरासरी २,५४१ रुपये, मुग (०९ क्विंटल) १,५०० ते ६,८१२ सरासरी ६,००० रुपये, हरभरा (३६ क्विंटल) ३,५०१ते ५,१५१ सरासरी ४,२२८ रुपये प्रति क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव : उन्हाळ कांदा (४८,६६० क्विंटल) भाव रुपये ७०० ते ३,२४० सरासरी रुपये २,५००, गहू (७७ क्विंटल) २,४०० ते ३,१०० सरासरी २,५०० रुपये, बाजरी (०६ क्विंटल) १,७५१ ते २,५०० सरासरी २,००० रुपये, मका (३,०८२ क्विंटल) १,३११ ते २,१४१ सरासरी १,९०० रुपये, मुग (१७ क्विंटल) २,००० ते ७,८०० सरासरी ६,५०० रुपये, सोयाबीन (२७,२३०) क्विंटल ५,००० ते ५,५०१ सरासरी ५,१५० रुपये प्रती क्विंटल राहीले, अशी माहिती बाजार समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com