Ganesh Idol Export : ठाण्याच्या ‘बाप्पा’ची पाच वर्षांनंतर पुन्हा परदेशवारी

Ganesh Utsav 2025 : शहरातील ८० वर्षे जुना व ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा कारखाना असलेल्या श्री गणेश चित्रकला मंदिरातील गणपती बाप्पांना कोरोनानंतर पुन्हा परदेशात मागणी वाढली आहे.
Ganesh Idol Making
Ganesh Idol MakingAgrowon
Published on
Updated on

Thane News : शहरातील ८० वर्षे जुना व ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा कारखाना असलेल्या श्री गणेश चित्रकला मंदिरातील गणपती बाप्पांना कोरोनानंतर पुन्हा परदेशात मागणी वाढली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी उठवल्याने रात्रंदिवस काम करून मूर्तिकार रेखीव आणि प्रभावी मूर्ती घडवत आहेत. यंदा शाडूच्या मूर्तींकडे भाविकांचा कल वाढल्याने हजारो मूर्ती घडवल्याची माहिती विश्वस्त उल्हास आंबवणे यांनी दिली.

Ganesh Idol Making
Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष मनोहर आंबवणे यांचे वडील व उद्योजक हरिश्चंद्र आंबवणे यांनी श्री गणेश चित्रकला मंदिर हा कारखाना सुरू केला. तेव्हा हा कारखाना माणिक सोनारचा कारखाना म्हणून ओळखला जायचा. अगदी १०० मूर्तींपासून सुरू केलेल्या या कारखान्यात आता चौथी पिढी मूर्ती घडवत आहेत.

चौथ्या पिढीतील समीर आंबवणे व सागर आंबवणे हे मूर्ती घडवतात. आंबवणे यांनी यंदा आठ इंचापासून ते अगदी दहा फुटांपर्यंतच्या तीन ते साडेतीन हजार मूर्ती घडवल्या आहेत. यात जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त शाडूच्या गणेशमूर्ती आहेत.

Ganesh Idol Making
Agriculture Inspection: पुणे जिल्ह्यात बोगस निविष्ठांवर कृषी विभागाची करडी नजर 

सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅॅरिसच्या मूर्तींवरील बंदी हटवल्यानंतर मोठ्या आकाराच्या आणि गणेशोत्सव मंडळाच्या मागणीनुसार दोन महिन्यांत रात्रंदिवस मेहनत करून दीड हजार मूर्ती तयार केल्या आहेत. गणपती, गौराईनंतर नवरात्री आणि माघी गणेशोत्सव असे बाराही महिने मूर्तींची घडण येथे होत असते. ऐन मोसमात या ठिकाणी २८ ते ३० कामगार असतात, तर बाराही महिने १० कामगार चित्रकला मंदिर सांभाळतात.

मूर्ती घडवताना मूर्तीचे डोळे आणि रंगकामावर विशेष लक्ष दिले जाते. अनुभवी कलाकार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. प्रत्येक कारागीर कुटुंबातील एक भाग आहे. कला मंदिराला कारागिरांमुळेच लौकिक मिळाले आहे.
- उल्हास आंबवणे, विश्वस्त, श्री गणेश चित्रकला मंदिर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com