Nanded Apmc Election Update : नांदेड जिल्ह्यात पाच बाजार समित्यांसाठी ७५८ उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड जिल्ह्यातील नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसह भोकर, नायगाव, कुंटूर व हिमायतनगर या ठिकाणच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Nanded APMC Election
Nanded APMC ElectionAgrowon

Nanded Election News : नांदेड जिल्ह्यातील नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Nanded Agriculture Produce Market Committee) भोकर, नायगाव, कुंटूर व हिमायतनगर या ठिकाणच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ७५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या दिवशी गर्दी केली होती. २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून प्रशासकीय संचालक मंडळ असलेल्या नांदेडसह भोकर, नायगाव, कुंटूर आणि हिमायतनगर या पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २७ मार्चपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली.

तीन एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये नांदेड बाजार समितीसाठी सर्वाधिक २९२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Nanded APMC Election
APMC Election : निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत

नांदेड बाजार समितीचा व्यवहार चांगला असल्यामुळे या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यामध्ये काँग्रेससह इतर सर्वच पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या यासोबतच भोकर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यासह तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९० अर्ज दाखल झाले आहेत, तर नायगाव तालुक्यातीलच कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ही ९० अर्ज दाखल झाले आहेत.

यासोबतच हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ९२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच ठिकाणी गर्दी झाली होती.

उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com