Silk Market
Silk MarketAgrowon

Silk Market : बारामती बाजारात रेशीम कोषाला प्रतिकिलो ७२५ रुपयांचा दर

Silk Cocoon Rate : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ४) कोषास ७२५ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.
Published on

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ४) कोषास ७२५ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. बारामती बाजार समितीचे रेशीम मार्केट हे ऑनलाइन असल्याने महाराष्ट्र राज्यातील, तसेच कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील खरेदीदार यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे कोषास चांगला भाव मिळत आहे.

रेशीम कोषास वाढत असलेल्या दरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवडीकडे वळत आहे. बारामतीमध्ये पारदर्शक व्यवहार, कोषाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, ऑनलाइन पेमेंट, कुठलीही कडती नाही.

Silk Market
Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कोष बारामती रेशीम कोष मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.

बाजार समितीने समितीमार्फत कोष खरेदीसाठी व्यापाऱ्यांना, तसेच रिलर्स यांना लायसन्स दिले असल्याने महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील लासन्सधारक खरेदीदार ऑनलाइन कोष खरेदी करीत आहेत.

Silk Market
Sericulture : सांगलीतील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल

रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ४) ५४० किलो कोषाची आवक होऊन किमान ५९० रुपये, तर सरासरी ६९० रुपये असा भाव मिळाला आहे. काळुराम हरिभाऊ घाडगे आणि प्रमोद दादाभाऊ घाडगे (रा. दावडी ता. खेड जि. पुणे) या रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषास जास्त भाव मिळाला आहे.

सात कोटी रुपयांची उलाढाल

२०२२ पासून रेशीम मार्केट सुरू झाल्यापासून आतापर्यंत सात कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. १६० टन कोष विक्री झाली आहे. बारामतीसह पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यातून शेतकरी कोष घेऊन येत असून जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com