Health Survey : देशातील ७२ टक्‍के लोकसंख्या मांसाहारी

Non-Vegetarian : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०२२ नुसार देशात ७२ टक्‍के लोकसंख्या मांसाहारी असल्याची बाब समोर आली आहे.
Poultry
PoultryAgrowon

Nagpur News : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०२२ नुसार देशात ७२ टक्‍के लोकसंख्या मांसाहारी असल्याची बाब समोर आली आहे. परंतु शरीराला आवश्‍यक तितक्‍या प्रोटिनचा पुरवठा व्हावा याकरिता प्रति व्यक्‍ती, प्रति वर्ष ११ किलो मांस खाणे गरजेचे आहे.

सध्या महाराष्ट्रात हे प्रमाण अवघे ९.६ किलो असून, देशाची सरासरी केवळ ७ टक्‍के असल्याची माहिती राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

हैदराबाद (तेलंगणा) येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेला २५ वर्षे झाली असून, संस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बारबुद्धे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.

ते म्हणाले, की देशात सरासरी प्रति व्यक्‍ती मांस सेवनाचे प्रमाण ७.१ किलो आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणात ते दुप्पट म्हणजे २८, तर महाराष्ट्रात हे प्रमाण अवघे ९.६ किलो आहे. मांसावर प्रक्रियेचा अभाव असल्याने महाराष्ट्रात पशुपालकांना त्यांच्या जनावरांचा योग्य दर मिळत नाही.

Poultry
Poultry Business : अडतीस वर्षांपासूनच्या पोल्ट्री उद्योगाचे साधले विस्तारीकरण

त्यामुळेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, आदिलाबाद या भागांतून रोज २० ते २५ ट्रक शेळ्या हैदराबादला मांसलकामी विकायला येतात. मांस संशोधन संस्थेने मटण, चिकन लोणचे यासह मांसापासून २५ ते २६ प्रक्रियाजन्य पदार्थ विकसित केले आहेत. हैदराबाद हलीम हे या भागात प्रसिद्ध आहे. ईदच्या काळात याला मोठी मागणी राहते. सहा ते सात तास कढईत मटण शिजवितात.

त्यानंतर ते गळते यात मग काजू, बदाम व इतर घटक टाकतात. याचे सेवन केल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. हैदराबाद हलीम हे युनीक असल्याने त्याला भौगोलिक मानांकन काहींनी मिळविले आहे. त्याकरिता संस्थेने प्रयत्न केले. हलीमपासूनच हलीम बॉल्स तयार करण्यात आले आहेत. यात प्रक्रिया करून हलीम वाळविले जाते व वर्षभर कधीही खाता येते.

Poultry
Poultry Business Brand : सांगलीचे बाळासाहेब पोल्ट्री व्यवसायाचे ब्रँड, ४८ हजार पक्षांचे होते संगोपन

वर्षाकाठी ७५ नमुन्यांची तपासणी

संस्थेच्या परिसरात नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी (एनएबीएल) प्रमाणित तीन प्रयोगशाळा आहेत. संस्थेच्या काही प्रयोगशाळांच्या माध्यमातून मांस कोणत्या प्राण्याचे आहे याविषयीचे प्रमाणीकरण होते.

गोवंशीय प्राण्याच्या मांसावर बंदी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अशा काही प्रमाणात पोलिस तक्रार झाल्यानंतर त्या मांसाचे अधिकृत प्रमाणीकरण व्हावे याकरिता संस्थेकडे ते पाठविले जाते. वर्षभरात देशभरातून अशा प्रकारचे ७५ ते ८० नमुने तपासणीसाठी येतात.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या या संस्थेद्वारा पशुपालन ते मार्केटिंगपर्यंत काम होते. भारताचा मांस बाजार मोठा आहे. भारतातून दरवर्षी सरासरी ३२ हजार कोटींचे मांस व प्रक्रियाजन्य पदार्थाची निर्यात होते. त्यामध्ये २५ हजार कोटी रुपयांचे म्हशींचे मांस आहे. त्यानंतर शेळी, मेंढी या श्रेणीतील मांसाचा समावेश होतो. भारतातील काही राज्यांमध्ये वराहाच्या मांसाला मागणी आहे. देशात मांस व्यवसाय अस्वच्छ क्षेत्रात होत असल्याने मांस सेवन करण्यासाठी अनेक जण नाक मुरडतात. मांस व्यवसायाचा परिसर स्वच्छ असावा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- एस. बी. बारबुद्धे, संचालक, राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com