sandeep Shirguppe
सांगली बेणापूर गावातील कृष्णदेव गुंडा शिंदे यांचे नाव पोल्ट्री व्यवसायातील ब्रँड झाला आहे. पंचक्रोशीत त्यांना बाळासाहेब नावाने ओळखले जाते.
सुमारे ३८ वर्षांपूर्वी एकहजार पक्षांपासून सुरू झाली होती सुरवात. टप्प्याटप्प्याने दोनहजार, नऊहजार असे करीत आजमितीला ४८ हजार पक्षांचे होते संगोपन.
अविरत कष्ट करून सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी या भागात जोरदार अंडी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.
कृष्णदेव यांनी जुने यंत्र खरेदी करून स्वतःच खाद्य निर्मिती युनिट सुरू केले. त्यातून दर्जेदार प्रथिनयुक्त खाद्य गुणवत्ता मिळवण्याबरोबर त्यावरील खर्चात बचत केली.
सुमारे ८० आठवड्याच्या काळात प्रति पक्षी ४७० ते ४९० पर्यंत अंडी देतो. प्रति अंडे उत्पादन खर्च सुमारे ४ रुपये २० ते ३० पैसे असतो.
वर्षाला सुमारे पाचहजार रुपये प्रति टन दराने कोंबडीखताची विक्री होते. त्यातून काही लाखांच्या आसपास पूरक उत्पन्न मिळते.
मुख्य लेयर शेड
एकूण पाच ते सहा शेडस आहेत. पैकी दोन शेडस या पिल्लांच्या वाढीसाठी आहेत. येथे १२ आठवडे एक दिवसीय पिल्लांची वाढ होते. त्यानंतर मुख्य लेयर शेडमध्ये त्यांचे स्थलांतर केले जाते.
दररोज सकाळी शेडची स्वच्छता ठेऊन ‘हायजेनिक’ व्यवस्था ठेवली जाते. प्रथिनांचा विनाकारण मारा न करता काटेकोर खाद्य व्यवस्थापन.