Fire at Delhi Children's Hospital : दिल्लीत बेबी केयर सेंटरला भीषण आग; ७ नवजात बालकांचा मृत्यू, अनेक जखमी

Massive Fire Broke Out At Children’s Hospital : दिल्लीतील विवेक विहार येथील बाल रुग्णालयात शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा आग लागली. या अपघातात ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला असून अनेक जन जखमी झाले आहेत.
Fire at Delhi Children's Hospital
Fire at Delhi Children's HospitalAgrowon

Pune News : गुजरातमधील राजकोटच्या टीआरपी या गेमझोनला शनिवारी (ता.२५) लागलेल्या भीषण आगीत ९ बालकांसह २८ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच एकाच दिवशी दिल्लीत देखील अशीच हृदयदावक घटका दिल्लीत घडली. दिल्लीतील विवेक विहार येथील बाल रुग्णालयास शनिवारी रात्री भाषण आग लागली. या आगीत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला असून ५ बालकांना वाचवण्यात यश आले आहे. तर वाचवण्यात आलेल्या या पाचही नवजात बालकांना पूर्व दिल्लीच्या प्रगत एनआयसीयू रुग्णालयात हलवण्यात आल्याचे दिल्ली अग्निशमन सेवा प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर शोक व्यक्त केलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्लीतील विवेक विहार येथे तीन मजली विवेक विहार रुग्णालय असून पहिल्या मजल्यावर न्यू बॉर्न बेबी केअर सेंटर होते. यात १२ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. याच मजल्याला शनिवारी रात्री आग लागली. यात ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याची माहिती देखील गर्ग यांनी दिली.

यावरून डीएफएसचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले असून प्राथमिक तपासात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. बेबी केअर सेंटरच्या खाली तळमजल्यावर अवैध ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंगचे काम सुरू होते.

Fire at Delhi Children's Hospital
Rajkot Gaming Zone Fire : गुजरातमधील गेमझोनला बनला मृत्यूचा सापळा; आगीत २८ जणांचा मृत्यू, ९ लहान मुलांचा बळी

रात्री ११:३० वाजण्याच्या दरम्यान फायर सर्व्हिस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ १६ अग्निगमन दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी पोहचले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीची झळ दोन इमारतींना बसली. एक रूग्णालयाची आणि दुसरी शेजरी असणारी रहिवाशी. या दोन्ही इमारतींमधील दुसऱ्या मजल्यावरही आगी लागली. यामुळे ११ ते १२ जणांना वाचवण्यात आले. तसेच जे जखमी झाले त्यांना रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

रुग्णालयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चार मजली आणि दुमजली इमारतींनाही आगीचा फटका बसला. आगीमुळे रूग्णालयात ठेवलेल्या ऑक्सिजन सिलिंडर स्फोट झाला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.

Fire at Delhi Children's Hospital
Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

हृदयद्रावक बातमी

या घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त करताना, दिल्लीतील विवेक विहार येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव शोकाकुल माता-पिता व कुटुंबीयांना देवो. या घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, असेही भावना राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.

दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेला ‘हृदयद्रावक’ म्हटले आहे. तसेच या दुर्घटनेत ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली त्यांच्या पाठीशी सरकार आणि आम्ही सर्वजण उभे आहोत. सरकारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी असून सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच या निष्काळजीपणाला जो कोणी जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सध्या या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात असल्याचेही केजरीवाल म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com