Rajkot Gaming Zone Fire : गुजरातमधील गेमझोनला बनला मृत्यूचा सापळा; आगीत २८ जणांचा मृत्यू, ९ लहान मुलांचा बळी

Rajkot Gaming Zone Fire Gujarat : गुजरातच्या राजकोटमधील एका गेमझोनला लागलेल्या आगीत तब्बल २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या २८ जणांमध्ये ९ लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Rajkot Gaming Zone Fire
Rajkot Gaming Zone FireAgrowon

Pune News : गुजरातच्या राजकोटमधील एका गेमझोनमध्ये शनिवारी (ता.२६) लागलेल्या भीषण आगीत नऊ लहान बालकांसह २८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रविवारी (ता.२६) सकाळी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. तसेच मुख्यमंत्री पटेल यांनी या घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून पोलीस आयुक्तांनी, शहरातील सर्व गेमझोन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवरून शोक व्यक्त केला आहे.

गुजरातमधील राजकोटमधील टीआरपी या गेमझोनला शनिवारी भीषण आगडोंब उसळला. यात ९ बालकांसह २८ जणांचा मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी रात्री उशीरापर्यंत काम करत होते. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या दुर्घटनेत अनेकांचे मृतदेह पूर्णपणे होरपळले आहेत.

Rajkot Gaming Zone Fire
Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

सध्या ओळख पटवणे मुश्किल झाले असून अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) विनायक पटेल यांनी डीएनए नमुने गोळा करण्यात येत असल्याचे एनडीटीव्हीला माहिती दिली आहे. "मृतदेह ओळखता येण्यापलीकडे जळाले असून मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा केली आहेत. यामुळे मृतांची ओळख पटवता येईल, असेही अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) पटेल यांनी म्हटले आहे. या घटनेत तीन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यांची असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यांची विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन केली आहे. तसेच ७२ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले असून आजही घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. यादरम्यान शनिवारी संध्याकाळी टीआरपी गेम झोनचा मालक आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Rajkot Gaming Zone Fire
Nainital Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे रौद्र रूप; प्रशासन मात्र ढिम्म

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, आगीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी राजकोटमधील एम्समध्ये ३० आयसीयू बेड तयार करण्यात आली आहेत. यासोबतच एम्सला संपूर्ण मदत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले. या घटनेत मृत्यूमुख्यी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ४ आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

एसीचा स्फोट

सध्या देशभरात उन्हाचे चटके बसत असून येथे देखील बचावासाठी एसी बसविण्यात आले होते. मात्र शॉर्टसर्किटमुळे एका एसीचा स्फोट झाल्याने येथे आग लागली आणि जनरेटरसाठी ठेवण्यात आलेल्या १५०० लिटर पेट्रोलच्या साठ्यासह पडदे, प्लास्टिक आणि इतर वस्तूंमुळे आग झपाट्याने पसरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शनिवारी झालेल्या या दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. राजकोटमधील आगीच्या दुर्घटनेने मी अत्यंत दुःखी झालो आहे. माझ्या सहवेदना या सर्वांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमींसाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com