Agriculture Insurance : खरीप पीकविमा योजनेत ७ लाख १९ हजारांवर अर्ज

Insurance Update : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख १९ हजार २९७ पीकविमा अर्ज दाखल आहेत. या शेतकऱ्यांनी ४ लाख ८५ हजार २७ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : या वर्षीच्या खरीप हंगामात सोमवार (ता. १५)पर्यंत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख १९ हजार २९७ पीकविमा अर्ज दाखल आहेत. या शेतकऱ्यांनी ४ लाख ८५ हजार २७ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. दरम्यान, खरीप पीकविमा अर्ज सादर करण्यासाठी ता. ३१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

खरीप पीकविमा योजना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना लागू आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून पीकविमा अर्ज दाखल करता येतील. बँका तसेच सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) तसेच पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या देखील विमा अर्ज सादर करता येतात.

Crop Insurance
Crop Insurance : दोन लाख ८४ हजार शेतकऱ्यांचा पीकविमा

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोमवार (ता. १५) पर्यंत ७ लाख १९ हजार २९७ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. खरिपातील ४ लाख ८५ हजार २७ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ५६३ कोटी २५ लाख ४९ हजार १२१ रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे.

Crop Insurance
Crop Insurance Fraud : पीक विमा घोटाळाः आंध्र प्रदेशातील ठगाला बेड्या ठोकण्याचे आव्हान

शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ७ लाख १९ हजार २९३ रुपये विमा हप्ता भरला आहे. राज्य शासनाच्या हिश्‍शाचा ३९३ कोटी ७७ लाख ३६ हजार ९१६ रुपये व केंद्र शासनाच्या हिश्‍शाचा ३२८ कोटी ६३ लाख ५ हजार १५७ रुपये मिळून एकूण ७२२ कोटी ४७ लाख ६१३६७ रुपये विमा हप्ता आहे.

तालुकानिहाय पीकविमा अर्ज स्थिती (विमा संरक्षित क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका पीकविमा अर्ज विमा संरक्षित क्षेत्र

परभणी १००२५५ ८३११५

जिंतूर १३८४४९ ८२५२२

सेलू ८५५७३ ५४६४१

मानवत ४६६९१ ३९२८८

पाथरी ५७०९५ ४३२३१

सोनपेठ ४५८३४ ३७२४८

गंगाखेड ९१८७७ ५१७८४

पालम ७७३६५ ४२७५०

पालम ७६१५८ ४९७४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com