Crop Compensation : यवतमाळ जिल्ह्यात ६४ हजार बाधित शेतकरी निधीपासून वंचित

Deprived of Crop Funds : यवतमाळ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहेत. ६४ हजार १३८ बाधित शेतकरी मदतनिधीपासून वंचित आहेत.
Crop Compensation
Crop CompensationAgrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहेत. ६४ हजार १३८ बाधित शेतकरी मदतनिधीपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे २०२३ धील अवकाळी पाऊस, मॉन्सून ऑक्टोबर २०२१, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२, जून, जुलै २०२३मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Compensation
PM Kisan Scheme : ‘पीएम’, ‘नमो’पासून ९३ हजार शेतकरी वंचित

शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी, याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत दोन लाख ८२ हजार ३८६ बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली.

Crop Compensation
Crop Damage : मळगाव परिसरातील नाचणीची पाने करपली

जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे दोन लाख ११ हजार १४८ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात १४९ कोटी पाच लाख २० हजार इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.

काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी केली नसल्यामुळे अजूनही ६४ हजार १३८ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतनिधी शासनस्तरावरून वितरित करता आलेला नाही.

त्यामुळे तालुका कार्यालय, तलाठी यांच्याकडून व्हीके नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांना जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण, ई-केवायसी करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com