
Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यातील सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये (Yeldari Dam) सोमवारी (ता. ३) सकाळी ६८.९० टक्के (५५७.९७७ एमएमक्युब ) आणि सिद्धेश्वर धरणामध्ये ५१.३४ टक्के (४१.५६१ एमएमक्युब) उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) होता.
तापमानातील वाढ, बेसुमार उपसा, बाष्पीभवन, कालव्याव्दारे आवर्तने आदी कारणांमुळे मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प, उच्च पातळी बंधाऱ्यांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट सुरु आहे.
येलदरी धरणाची साठवण क्षमता ९३४.४४ एमएमक्युब आहे. सोमवारी या धरणात ६८२.६४७ एमएमक्युब पाणीसाठा होता. जिवंत पाणीसाठा क्षमता ८०९.७७० एमएमक्युब आहे. सोमवारी सकाळी ५५७.९७७ एमएमक्युब पाणीसाठा होता.
गतवर्षी याच तारखेला ५८४.५१६ एमएमक्युब पाणीसाठा होता. बाष्पीभवनाव्दारे ०.२८४ एमएमक्युब आणि इतर ०.१२४ एमएमक्युब पाणीसाठा कमी होत आहे.
जिंतूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १.९३९ एमएमक्युब राखीव साठ्यातून दररोज ०.००७ एमएमक्युब, परभणी शहरासाठी ५.६११ एमएमक्युब पाणीसाठ्यापैकी दररोज ०.०२५ एमएमक्युब, सेनगाव साठी ०.५५४ एमएमक्युब पैकी ०.००२ एमएमक्युब पाणीपुरवठा केला जातो.
सिध्देश्वर धरणातून सिंचनासाठी १८०.८६४ एमएमक्युब पाणी सोडण्यात आले. पाणी पुरवठा योजनांसाठी ४.१५५ एमएमक्युब पाणीसाठा राखीव आहे.
उपसा सिंचनसाठी ०.०८३ एमएमक्युब पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा घटत आहे. सोमवारी (ता.३) सकाळी निम्म दुधना धरणामध्ये ४३.१३ टक्के तर माजलगाव धरणामध्ये ५२.५६ टक्के जिवंत पाणीसाठा होता.
गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये ५४.७४ टक्के, तारुगव्हाण बंधाऱ्यांमध्ये ६२.३१ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ५९.५८ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये २.६९ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये २९.०५ टक्के जिवंत पाणीसाठा होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.