Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Green Net Business : कृषी उत्पादनाच्या आच्छादनासाठी प्रारंभी बाजारात आलेल्या ‘ग्रीन नेट'चा बाजार आता विस्तारला आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Nagpur News : कृषी उत्पादनाच्या आच्छादनासाठी प्रारंभी बाजारात आलेल्या ‘ग्रीन नेट'चा बाजार आता विस्तारला आहे. त्यामुळेच अंगण, घरासमोरील छोटासा बगीचा, वाहनांना सावलीसाठी याचा वापर वाढला होता.

शहरात ग्रीन नेट विकत घेत असल्याने या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आले होते. आता मात्र, हवामानाची वक्रदृष्टी पडल्याने दोन वर्षांपासून ‘ग्रीन नेट'च्या व्यवसायावर मरगळ आली आहे. तब्बल ६० टक्के व्यवसाय ठप्प झालेला आहे.

अवकाळी पावसामुळे उन्हाचा तडाखा कमी झाल्याने एसी आणि कुलरच नव्हे तर आइस्क्रीम, टाल्कम पावडर, शीतपेये, ग्रीन नेट आणि साबणाच्या विक्रीतही घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. तापमान फार न वाढल्यामुळे लोकांनी या वस्तू विकत घेण्याची योजना लांबणीवर टाकली आहे.

Climate Change
Climate Change : वाळवंटीकरण वाढवेल समस्येची तीव्रता

साधारणतः एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने ग्रीन नेटचा खरेदीला वेग येत असतो. मागील दोन वर्षांपासून एप्रिल महिन्यातच अवकाळी पाऊस येऊ लागला आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या व्यापाऱ्यांना फटका बसू लागला आहे. हा व्यवसाय ६० टक्के घटला आहे.

Climate Change
Climate Change : हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम

या व्यवसायात अंदाजे सहा ते सात कोटींची उलाढाल होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. एप्रिलच्या कमी तापमानामुळे अनेकांनी ग्रीन नेटच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. आता तीव्र उन्हाचा एकच महिना शिल्लक असल्याने त्यात व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा धूसर आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पूर्वी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या ग्रीन नेटला मागील काही वर्षांपासून घरगुती वापरासाठी मागणी वाढली. यंदा मात्र, सतत हवामानात बदल होत असल्याने त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे. व्यापार ६० टक्क्याने घटला आहे.
- अशोक संघवी, ग्रीन नेट विक्रेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com