Ration Grain : सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख व्यक्तींचे रेशन बंद होणार

Ration Card E-KYC : र्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon
Published on
Updated on

Solapur News : आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे. त्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून ही मुदतवाढ शेवटची आहे. अजूनही सोलापूर शहरातील एक लाख तर ग्रामीणमधील पाच लाख व्यक्तींनी ई-केवायसी केलेली नाही, मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ एप्रिलपासून त्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे.

केंद्र सरकारने रेशनदुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी करण्यासंदर्भातील आदेश काढले असून त्यानुसार राज्य सरकारने देखील परिपत्रक काढले आहे.

Ration Shop
Ration Grain : गव्हात कपात, तर सहा महिन्यांपासून साखर बेपत्ता

सोलापूर शहरातील रेशनकार्डवरील सव्वाचार लाख व्यक्तींनी ई-केवायसी केली आहे. तर ग्रामीणमधील १८ लाख ३० हजार व्यक्तींपैकी सव्वपाच लाख व्यक्तीही ई-केवायसीपासून दूरच आहेत. मात्र, पाच वर्षांखालील चिमुकली आणि ७० वर्षांवरील वृद्धांची ई-केवायसी होत नसून त्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत.

सोलापूरसह राज्यभरात अशीच स्थिती असून त्यावर मार्ग न निघाल्यास यांचे धान्य बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. आधारकार्डनुसार त्यांची रेशनधान्य दुकानात ई-केवायसी करताना प्रक्रिया पुढेच जात नाही, असा अनुभव पुरवठा अधिकाऱ्यांनाही आला आहे. त्यांनी तशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाला कळविली आहे.

Ration Shop
Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

गुढीपाडव्याला ५७ हजार महिलांना साड्या

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी दिली जाते. त्यानुसार सोलापूर शहरातील सहा हजार ७२ आणि ग्रामीणमधील ४९ हजार १०३ महिलांना आता गुढीपाडव्याला रेशन दुकानातून नवीन साडी मिळणार आहे. अजून शासन स्तरावरून साड्या आलेल्या नाहीत, पण गुढीपाडव्याला या महिलांना साड्यांचे वाटप होईल, असे प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.

रेशन दुकानातून स्वस्त धान्य यापुढेही कायम मिळावे, यासाठी रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने मेरा ई-केवायसी ॲप तयार केले आहे. लाभार्थींना स्वत: घरी बसूनही त्याच्याकडील ॲन्ड्राईड मोबाईलवरूनही ई-केवायसी करता येईल. याशिवाय रेशनदुकानातूनही ई-केवायसी करता येते. ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया करावी, आता मुदतवाढ मिळणार नाही.
- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com