
Parbhani News : परभणी ः यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत रविवार (ता. १५) पर्यंत एकूण ३ लाख ४१ हजार ८५२ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मिळून एकूण ६ लाख २ हजार ८०३ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत.
या शेतकऱ्यांनी ४ लाख ६८ हजार ६१० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ७५९ कोटी २४ लाख १० हजार रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीचे विमा प्रस्तावासाठी शनिवार (ता. ३० नोव्हेंबर), तर गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी रविवार (ता. १५) पर्यंत अंतिम मुदत होती.
उन्हाळी भुईमूग विमा प्रस्तावासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे. परभणी जिल्ह्यातील रविवार (ता. १५) पर्यंत २ लाख ६६ हजार ३०७ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मिळून ४ लाख ७० हजार ८९९ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत.
त्यात कर्जदार शेतकऱ्यांचे १ हजार ७५७, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ४ लाख ६९ हजार १४२ विमा प्रस्ताव आहेत. या शेतकऱ्यांनी ३ लाख ६१ हजार ८०० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ३५२ कोटी ४० लाख ३५ हजार रुपये रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यात ७५ हजार ५४५ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मिळून १ लाख ३१ हजार ९०४ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यात कर्जदार शेतकऱ्यांचे २ हजार ८११ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे १ लाख २९ हजार ९३ विमा प्रस्ताव आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.