Farm Pond Scheme: सातारा जिल्ह्यातील शेततळ्यासाठी ५१९ शेतकरी पात्र 

Satara Farmers Agriculture Support: जिल्ह्यात शेततळे योजनेस २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी ५१९ शेतकरी पात्र ठरले असून यामध्ये पहिल्यांदा ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला पहिली पसंती दिली जाणार आहे.
Farm Pond Scheme
Farm Pond Agrowon
Published on
Updated on

Satara News: जिल्ह्यात शेततळे योजनेस २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी ५१९ शेतकरी पात्र ठरले असून यामध्ये पहिल्यांदा ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला पहिली पसंती दिली जाणार आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी ५० टक्के अर्थ साहाय्य राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजनेतून २०२३-२४ मध्ये २८३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, त्यापोटी शासनाने एक कोटी ८० लाखांचे अनुदान वितरण केले होते. शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी शासनाने अनुदानावर शेततळे योजना राबवली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे दिले जात होते.

Farm Pond Scheme
Farm Pond Subsidy : ‘मागेल त्याला शेततळे’च्या अनुदानात वाढ करण्याचा विचार

आता मागेल त्याला शेततळे दिले जाणार आहे. या योजनेत असलेल्या त्रुटी यावेळेस शासनाने दूर करून लॉटरीऐवजी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्यांना पहिली पसंती दिली जाणार आहे. या योजनेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२३-२४ मध्ये २८३ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता. त्यावेळी लॉटरीपद्धतीने अनुदान वितरित करण्यात आले होते. आता या योजनेसाठी २०२४-२५ मध्ये ५१९ शेतकरी पात्र ठरले आहेत.

Farm Pond Scheme
Farm Pond: आळंदी म्हातोबा ग्रामस्थांचे लोकवर्गणीतून शेततळे

त्यापैकी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्यांना पहिली पसंती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत वैयक्तीक शेततळे योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ४० गुंठे (एक एकर) जमीन आवश्यक आहे. त्याच्याकडील जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावी, अर्जदार इतर कोणत्याही शेततळे योजनेत सहभागी झालेला नसावा. यासाठी ऑनलाइन अर्ज घेऊन पहिल्यांदा अर्ज दाखल करणाऱ्यांना पहिली पसंती निवडीत दिली जाणार आहे. 

२०२३-२४ मध्ये तालुकानिहाय शेततळे संख्या आणि कंसात अनुदान वितरण लाखांत असे आहे. 

जावळी ९ (३.९०),कराड ८ (५.७९), खंडाळा ११ (५.७९), खटाव ६२ (४०.१३), कोरेगाव २९ (२१.८५), महाबळेश्वर २२ (१३.२४), माण ८५ (५४.८३), पाटण ११ (६.१५), फलटण २४ (१६.७७), सातारा १४ (७.७४), वाई ८ (४.६८). असे एकूण २८३ शेततळ्यांना १८०.९१ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले होत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com