Water Crisis : अर्धा पावसाळा उलटूनही ५१ प्रकल्प कोरडेच

Marathwada Water Scarcity : मराठवाड्यातील एकूण लघु, मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ५१ प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण लघु, मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ५१ प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. शिवाय, मोठ्या ११ प्रकल्पांपैकी माजलगाव व सीना कोळेगाव प्रकल्प अजून मृतसाठ्याच्या बाहेर आलेले नाहीत. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी ३३८ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ४३२.२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १२७.५ टक्के पाऊस झाला आहे.

आठही जिल्ह्यांत सरासरीच्या पुढे जाऊन असलेला पाऊस जून ते सप्टेंबर या पाऊस काळातील वार्षिक सरासरीच्या तुलनेत मात्र ६३.६ टक्के इतकाच आहे. पाऊस दिसत असला तरी प्रकल्पांमध्ये पाणी येण्याइतपत त्यामध्ये जोर नव्हता. त्याचा थेट परिणाम प्रकल्पांमधील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे न वाढविण्यावर होत आहे.

Water Crisis
Water Crisis : मराठवाड्यातील ९३ लघू- मध्यम प्रकल्प कोरडे

कोरड्या ४८ लघु प्रकल्पांत छत्रपती संभाजीनगर व बीडमधील प्रत्येकी १६, जालन्यातील ९, लातूरमधील ३ व धाराशिवमधील ४ प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या तीन मध्यम प्रकल्पांत जालना, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

याशिवाय मोठ्या ११ प्रकल्पांपैकी बीडमधील माजलगाव आणि धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहे. सीनाकोळेगाव प्रकल्पात १३.१ दलघमी तर माजलगाव प्रकल्पात ११५.४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. थोडासा पाणीसाठा झालेल्या निम्न दुधनात १० टक्के तर मांजरामध्ये २ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

जायकवाडी ९ टक्क्यांवर

जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा आता ९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय येलदरीत ३२ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ३५ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ४९ टक्के, निम्न तेरणात २८ टक्के, निम्न मनारमध्ये ६३ टक्के, विष्णुपुरी ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

दोन जिल्ह्यातील पाणीसाठा चिंताजनक

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ ५ टक्के तर ९८ लघु प्रकल्पांत ८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत केवळ ३ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत केवळ २ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Crisis
Water Crisis : पावसाळ्याचा मध्यावरही पाणीटंचाई

याव्यतिरिक्त बीडमधील १६ प्रकल्पांत २९ टक्के, १२६ लघु प्रकल्पांत १९ टक्के, लातूरमधील १३४ लघु प्रकल्पांत ३१ टक्के तर ८ मध्यम प्रकल्पांत २२ टक्के, धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत २३ टक्के तर २०६ लघु प्रकल्पांत २८ टक्के, नांदेडमधील ८० लघु प्रकल्पात ५१ टक्के तर ९ मध्यम प्रकल्पामध्ये ७३ टक्के, परभणीतील २ मध्यम प्रकल्पांत ४८ टक्के तर २२ लघु प्रकल्पांत २५ टक्के, हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पांत केवळ ३० टक्के उपयुक्त पाणी आहे.

पाणीसाठा स्थिती

प्रकल्प...संख्या...टक्केवारी

मोठे...११...१७.५९

मध्यम...७५...२६.९३

लघु प्रकल्प...७४९...२४.६९

गोदावरीवरील बंधारे...१५...३८.५७

तेरणा, मांजरा...२७....५५.५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com