Water Conservation : शिराळा, वाळवा तालुक्यांत ५० पाणवठे स्वच्छ

Forest Water Sources : चांदोली राष्ट्रीय उद्यानातून अन्नपाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या वन्य प्राण्यांचा परिसरातील गावांत असणाऱ्या वन विभागाचे जंगल व ऊस क्षेत्रात वावर वाढला आहे.
Water Conservation
Forest Water Sources Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शिराळा तालुका डोंगरी व दुर्गम आहे. जंगलासह उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातून अन्नपाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या वन्य प्राण्यांचा परिसरातील गावांत असणाऱ्या वन विभागाचे जंगल व ऊस क्षेत्रात वावर वाढला आहे.

शिराळा वनपरिक्षेत्रांतर्गत शिराळा, वाळवा तालुक्यांत ५० हून अधिक पाणवठे स्वच्छ करण्यात आलेत. शासकीय वनक्षेत्र व लगतच्या खासगी वनक्षेत्रात ठिकठिकाणी असणाऱ्या ५० हून अधिक पाणवठ्यातील गाळ व पालापाचोळा काढून सफाई केल्याने नैसर्गिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गत वर्षी जूनपूर्वी वळवाचा पाऊस चांगला झाला. पावसाळ्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. ऑक्टोबरनंतर पुन्हा अवकाळी पावसाने वारंवार हजेरी लावल्याने धरण, पाझर तलाव, विहिरी व कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. गत वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक दोन महिने वाढून राहिल्याने डिसेंबरअखेर टिकून राहिला.

Water Conservation
Soil And Water Conservation : शिवारातील पाणी शेतातच अडवून जिरविण्याचे उपाय

आता फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने तलाव, विहिरी, कूपनलिका व जंगलातील नैसर्गिक झऱ्यांची पातळी घटू लागली. जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडू लागले.

Water Conservation
Water Conservation : ‘जलतारा’तून साताऱ्यात होणार ७५ हजार कामे

उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर, स्वाती पाटील, वनसेवक, रोजंदारी मजुरांनी वनविभागाच्या व लागतच्या खासगी क्षेत्रातील पाणवठ्यांची सफाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे.

जंगलात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यास वन्य प्राणी खासगी क्षेत्रात येऊन शेत, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते. आता जंगलात पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास त्यांच्या वावर खासगी क्षेत्राकडे कमी होण्यास मदत होईल.

वनक्षेत्र व पाणवठे

बिऊर (१०), बिळाशी (२), खुजगाव (४), रिळे (६), गिरजवडे (४), पणुंब्रे (२), गोटखिंडी (४), रेड (५), भवानीनगर (५) यांसह अन्य १० हून अधिक ठिकाणी ५० हून अधिक पाणवठ्यांची सफाई करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com