Onion Dehydration : कांदा निर्जलीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न

Onion Market : येवला लासलगावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी अधिक असल्याने चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर कांदा निर्जलीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) येवला बाजार समिती व अंदरसूल उपबाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या वेळी अंदरसूल उपबाजार येथे आयोजित कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

Onion
Onion Farming : दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्याला मोठी पसंती

या वेळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारुतीराव पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, सचिव के. आर. व्यापारे, संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक वसंत पवार, रतन बोरनारे, संजय बनकर, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सरपंच लता जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार अंदरसूल समितीचे सदस्य, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘येवला लासलगावसह परिसरात कांदा उत्पादक शेतकरी अधिक असल्याने चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जागेची निवडदेखील करण्यात आलेली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर उपलब्ध होणार आहे.’’

Onion
Onion Farming Training : राजस्थानच्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाचे धडे

राज्याचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्येही एआय यंत्रणा विकसित करावी. त्यातून शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक माहिती उपलब्ध होईल. त्यातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन शक्य होणार आहे.

प्रक्रिया उद्योगाला चालना देणार

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डोंगरगाव उपबाजारासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या उपबाजारासाठी शासनाकडून जागा उपलब्ध होईल.

तालुक्यातील १७०० हून अधिक शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या शेतकऱ्यांना ही मदत लवकरच प्राप्त होईल. आगामी काळात येवला बाजार समितीच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया उद्योग, रेशीम बाजार पेठ व कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com