New Gram Panchayat : नकार दर्शविल्याने अडकणार स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा

Rural Development : जिल्ह्यातील आर्णी, महागाव, दारव्हा, दिग्रस, नेर, उमरखेड, पुसद या सात तालुक्यांतील ५५७ ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत १८६ तांडे, वस्त्या अस्तित्वात आहेत.
Gram Panchayat Membership
Gram Panchayat ElectionAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : जिल्ह्यातील ६१ तांडे-वस्त्या लोकसंख्येनुसार मोठ्या आहेत. त्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात येणार आहे. याकरिता सध्या समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतींना ठराव मागण्यात आला होता. यातून ४९ ग्रामपंचायतींनी ठराव दिला. परंतु १२ ग्रामपंचायतींनी ठराव नाकारला. अशा ग्रामपंचायत प्रशासनावर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आर्णी, महागाव, दारव्हा, दिग्रस, नेर, उमरखेड, पुसद या सात तालुक्यांतील ५५७ ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत १८६ तांडे, वस्त्या अस्तित्वात आहेत. या तांडे, वस्त्यांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे.

Gram Panchayat Membership
Rural Development : भूमिहीन, अल्पभूधारकांचे जीवन झाले शाश्‍वत

या ठिकाणची लोकसंख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेंतर्गत आजघडीस लोकसंख्या वाढलेल्या ६१ तांडे, वस्त्या स्वतंत्र ग्रामपंचायतीकरिता पात्र आहेत.

Gram Panchayat Membership
Rural Development : शिक्षण, आरोग्य विभागांवर एकनाथ डवलेंची नाराजी

सध्या ६१ तांडे, वस्त्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा, याकरिता आजघडीस अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीकडून ठराव बोलाविण्यात आले होते. या तांडे, वस्त्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा देण्यात येणार आहे.

यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तयारी दाखविणे गरजेचे होते. परंतु स्वतःचे हित लक्षात ठेवता ४९ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. तर उर्वरित १२ ग्रामपंचायतींनी नकार दर्शविला आहे. नकार दर्शविण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना नाही. तरीसुद्धा हेकेखोरपणामुळे नकार दर्शविल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com