
Sangli News : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांचा कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्प म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. ४८ गावे पूर्णतः व १७ अंशतः विस्तारित योजनेत समाविष्ट केली आहेत.
यापूर्वी म्हैसाळ मूळ योजनेत ७७ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (पुणे) अंतर्गत मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग (पुणे) यांच्याकडून विस्तारित जत उपसा सिंचन योजनेस तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.
निधी उपलब्ध होईल, तसे चार वर्षांत कामाचे नियोजन केले जाईल. तालुक्यातील १२५ गावांपैकी मूळ म्हैसाळ योजनेवरील ७७ गावे वगळता उर्वरित ८८ गावे सद्यःस्थितीत सिंचनापासून वंचित आहेत. शासनास प्रतिवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच चारा छावण्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करावा लागतो, अशी स्थिती प्रतिवर्षी निर्माण होत आहे.
जत पूर्व भागातील जनता दुष्काळामुळे त्रस्त झाली आहे. या गावांना पाणी देण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे. त्याअनुषंगाने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरिक्त ६ अघफू पाणी वापरास मान्यता मिळाली.
अंशतः समाविष्ट गावे
माडग्याळ, व्हसपेट, संख, सिद्धनाथ, मालाळ, लवंगा, खोजानवाडी, मुचंडी, उमराणी, उमदी, सोन्याळ, उटगी, रामपूर, बिळूर, खिलारवाडी व साळमळगेवाडी.
पूर्णतः समाविष्ट गावे
गुड्डापूर, सोरडी, कुल्लाळवाडी, आसंगी (जत), तिल्लेहाळ, गोंधळेवाडी, अंकलगी, लमाणतांडा (पारधीवस्ती), काराजनगी, बेळोंडगी, बोर्गी खुर्द, दरीकोण्णूर, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), खंडनाळ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धुळकरवाडी, कागनरी, मोठेवाडी (तिकोंडी), तिकोंडी, पांडोझरी,
करेवाडी (तिकोंडी), भिवर्गी, जालिहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, बोरगी बुद्रुक, अक्कळवाडी, हळ्ळी, बालगाव, सुसलाद, सोनलगी, कोणबगी, कोंतेवबोबलाद, करेवाडी (कोंतेवबोबलाद), गुलगुंजनाळ, मोठेवाडी (लवंगा), गिरगाव, वाषाण, निगडी खुर्द, अचकनहळ्ळी, करजगी, कोळगिरी, सिंदूर, बसर्गी व गुगवाड
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.